Goa News: दिल्लीकरांना जमिनी विकू नका; कृषिमंत्री रवी नाईक यांचे गोमंतकीयांना आवाहन Video

Ravi Naik: पर्यटकांनी गोव्यात यावे, पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि माघारी जावे, असे नाईक म्हणाले.
Ravi Naik On Land And Agriculture
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: 'दिल्लीकरांना जमिनी विकू नका, आपल्या जमिनी संभाळा', असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी गोमंतकीयांना केले आहे. तसेच, राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसान याचा सर्व्हे करुन शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली आहे.

"दिल्लीत गर्मी, थंडी अधिक प्रमाणात पडते, यामुळे तेथील नागरिक हैराण होतात. त्यांना गोव्यात जमीन घेण्याची इच्छा असते. पण, गोमंतकीयांनी दिल्लीकर असो किंवा कोणत्याही परराज्यातील व्यक्ती त्यांना जमिनी विकू नयेत. काही ठिकाणी जमिनी विकल्यात पण, आता नागरिकांनी खबरदारी घेऊन जमिनी विक्री करु नयेत", असे आवाहन रवी नाईक यांनी केले.

Ravi Naik On Land And Agriculture
Goa Traffic Challan Fine: गोवा वाहतूक पोलीस विभागाला मोठा फटका! दंड महसुलात 1.80 कोटींची घट

"पूर्वापार असलेल्या जमिनी आपल्याला जपायला हव्यात, यासाठी आम्ही धोरण तयार केले आहे. अनेक पर्यटक गोव्यात गाड्या घेऊन येतात. रस्त्याच्या कडेला गाडी उभी करतात आणि जेवण बनवून कचरा तेथेच टाकून पसार होतात. असे पर्यटक आम्हाला नको आहेत. पर्यटकांनी गोव्यात यावे, पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि माघारी जावे", असे नाईक म्हणाले.

"गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात सर्व्हे करण्यास सांगितले आहे. सर्व्हे केल्यानंतर आलेल्या अहवालाचा अभ्यास करुन शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याचा आम्ही प्रयत्न करु", असे रवी नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com