Minister Nilkanth Halarnkar DIP
गोवा

Nilkanth Halarnkar: मुलांना मटका घेण्‍यास कांदोळकर प्रवृ‍त्त करत नाहीत ना? 'गृहनिर्माण'मधील शिक्षणावरून कलगीतुरा

Kiran Kandolkar News: गृहनिर्माण मंडळाच्‍या जागेत केवळ चौथीपर्यंतच शिक्षण देता येते व मंत्री नीळकंठ हळर्णकर हे मुलांना चौथीनंतर शिक्षण देऊन कायद्याचा भंग करत असल्‍याचा आरोप कांदोळकर यांनी केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुलांना चौथीपर्यंतच शिकवून त्‍यांना मटका घेण्‍यास किरण कांदोळकर प्रवृ‍त्त तर करत नाहीत ना? मुलांनी मटका घ्‍यावा अशीच त्‍यांची इच्‍छा आहे का? असे तिखट सवाल करून पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी कांदोळकरांनी काल केलेल्‍या आरोपांना जशास तसे उत्तर देण्‍याचा प्रयत्‍न केला.

थिवीतील जनतेने एकेकाळी किरण कांदोळकर यांना आमदार म्‍हणून निवडून देऊन समाजात चांगले काम करण्‍यांची संधी दिली होती. मात्र त्‍यांनी ते न केल्‍याने, लोकांनी त्‍यांना त्‍यांची जागा दाखवून दिली. आज ते पुन्‍हा आपली पात्रता दाखवून देऊ लागले आहेत, अशी बोचरी टीकाही हळर्णकर यांनी केली.

गृहनिर्माण मंडळाच्‍या जागेत केवळ चौथीपर्यंतच शिक्षण देता येते व मंत्री नीळकंठ हळर्णकर हे मुलांना चौथीनंतर शिक्षण देऊन कायद्याचा भंग करत असल्‍याचा आरोप कांदोळकर यांनी केला होता. त्‍यास उत्तर देताना मंत्री हळर्णकर यांनी त्‍यांचा समाचार घेतला.

किरण कांदोळकर यांना विद्यार्थी केवळ चौथीपर्यंतच शिकलेले हवे आहेत. या मुलांनी नंतर टेबल घालून मटका घ्‍यावा हेच त्‍यांना हवे आहे. त्‍यांच्‍यावर अनेक याचिका न्‍यायालयात आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे वकील असतीलच. त्‍यांनी त्‍याच वकिलांकडून अगोदर कायदा समजून घ्‍यावा.
नीळकंठ हळर्णकर, पशुसंवर्धनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT