Kiran Kandolkar and 3 other candidates tender resignation from Goa TMC Dainik Gomantak
गोवा

तृणमूल काँग्रेसला खिंडार, किरण कांदोळकरांसह कार्यकर्त्यांचा राजीनामा

गोवा राज्य समितीची पुनर्रचना करण्यात येणार

दैनिक गोमन्तक

गोवा तृणमूल काँग्रेसचे प्रमुख किरण कांदोळकर यांच्या पत्नी कविता कांदोळकर यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आपण आपल्या समर्थकांच्या परवानगीने राजीनामा देत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. कविता कांदोळकर यांनी नुकतीच गोवा विधानसभा निवडणूक थिवी मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर लढवली होती, त्यांचे पती किरण कांदोळकर यांनी हळदोणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्यावर तृणमूल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. किरण कांदोळकर यांच्यासह लिओ डायस, संदीप वझरकर, तारक आरोलकर कार्यकर्त्यांसमवेत पक्षाचा राजीनामा देणार असल्याची त्यांनी आज पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. (Kiran Kandolkar and 3 other candidates tender resignation from Goa TMC)

कविता कांदोळकरच्या या हालचालीमुळे टीएमसीला गोवा राज्य समितीची पुनर्रचना करणार असल्याची घोषणा करण्याची संधी मिळाली. पत्रकारांशी बोलताना कविता कांदोळकर म्हणाल्या की, माझ्या समर्थकांकडून टीएमसी सोडण्याचा दबाव होता, अनेक दिवस या दबावाला विरोध केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवा राज्य समितीची पुनर्रचना करण्यात येणार आहे

टीएमसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'लवकरच गोवा राज्य समितीची पुनर्रचना केली जाईल. या निमित्ताने गोव्यातील लोकांच्या भल्यासाठी काम करण्याच्या आमच्या गांभीर्याचा पुनरुच्चार करूया. खरे तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने एमजीपीसोबत एकत्र निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दुसरीकडे, 40 सदस्यांच्या सभागृहात 20 जागा जिंकणाऱ्या भाजपने एमजीपीचे दोन आमदार आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्याने सत्तेत पुनरागमन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Antonio Costa: ''माझ्‍या कुटुंबाची मुळे गोव्यात'', युरोपच्या सर्वोच्च नेत्याचा 'गोमंतकीय' बाणा; CM सावंतांचं खास ट्विट VIDEO

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

Goa Opinion: पदोन्नतीचा पूर आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ?

Goa Mining: '..अन्यथा खाणपट्टा बोलीला फटका'! निर्यातदार संघटनेचा इशारा; लोहखनिज निर्यातीवर शुल्क जाचक असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT