Chapora News  Dainik Gomantak
गोवा

Chapora: शापोरा येथील बेकायदेशीर गाळे हटवले

गाळे मालकांनी गाळे काढून घेणे केले सुरु

दैनिक गोमन्तक

दोन दिवसांपुर्वीच म्हणजेच बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मंत्री सुभाष फळदेसाई बार्देशातील शापोरा येथील किल्याला भेट देत या परिसराची पाहाणी केली होती. यावेळी किल्ल्याची झालेली पडझड तसेच पायथ्याशी बेकायदा उभारण्यात आलेले गाळे व तेथील परिसरात जमा झालेला कचरा पाहून संताप व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी बेकायदा उभारण्यात आलेले गाळे हटविण्याचे आदेश ही देण्यात आले होते. यावर आज गाळे मालकांनी बांधकामे काढून घेणे सुरु केले आहे.

(Kiosk owners begin dismantling illegal structures at Chapora fort)

मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 60-70 % बांधकामे गाळे मालकांनी काढणे सुरु केले आहेत. याबाबत बार्देश मामलेदार कार्यालयाने हणजूण तलाठी गौरीश नाईक यांच्यामार्फत सर्व बेकायदा गाळे तोडण्याची लेखी सूचना दिली होती. त्यानंतर गाळे मालकांनी स्वेच्छेने त्यांची संरचना हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बहूतांशी बांधकामे काढली आहेत.

हणजुण पोलिसांनी केली कारवाई

12 ऑक्टोबर रोजी बेकायदा गाळ्यांची पाहाणी करतेवेळी एका परप्रांतीय तरुणाने मंत्री फळदेसाई यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने हणजुण पोलिसांकडून त्याला तात्काळ ताब्यात घेतले होते. त्या तरुणाच्या विरोधात कलम 151 खाली गुन्हा नोंदवत त्याला कायदेशीर अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: गोव्याची फॉलोऑननंतर पुन्हा धडपड, 150 धावांनी पिछाडीवर; सौराष्ट्र मजबूत स्थितीत

Cuchelim: कामाला जातो म्हणून बाहेर पडले, 2 दिवसांनी सापडला मृतदेह; कुचेलीतील बेपत्ता व्यक्तीने घेतला टोकाचा निर्णय

Goa Theft: धक्कादायक! भरदुपारी 25 लाख पळवले, पोलिसांनी लपवली चोरीची घटना; सांताक्रूझ येथील घटनेमुळे नागरिक संतप्त

Goa ZP Election Date: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत मोठी बातमी, तारीख ढकलली 7 दिवसांनी पुढे; काय कारण? Watch Video

IFFI 2025: इफ्फी परेडची रंगीत तालीम अन् वाहतुकीचा बट्ट्याबोळ! 3 तास वाहनचालकांची परवड; बांदोडकर मार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप

SCROLL FOR NEXT