FOOD BANK FOR THE POOR: गोव्यातील 5,000 किलो अन्नाची नासाडी थांबवा

''आता कृती करण्याची वेळ आली''
Street Providence Trust
Street Providence TrustDainik Gomantak

गोवा राज्यातील कॅन्टीन आणि इतर फूड पॉईंट्मध्ये दररोज 5,000 किलोपेक्षा जास्त ताजे अन्न कचऱ्यात टाकले जात आहे. या कडे लक्ष वेधण्यासाठी फूड बँक फॉर द पुअर सांगोल्डा या संस्थेच्या नेतृत्वाखाली आज पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले.

(5000kgs of excess fresh food is being thrown in the dustbin across Goa by canteens and food points)

Street Providence Trust
Kala Academy Row: फळे असलेल्या झाडावरच लोक दगड मारतात; मंत्री गोविंद गावडे

भारतासह गोवा राज्यात अनेक नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळत नसल्याची स्थिती आहे. असे असताना गोवा राज्यात मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत आहे. ही स्थिती बदलने गरजेचे असुन याकडे एफडीएच्या संचालकांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

Street Providence Trust
Goa Rain: गोव्यात साखळी, डिचोली, सत्तरी भागात जोरदार पावसाला सुरवात

या आंदोलनावेळी सांगोल्डा येथील फूड बँक फॉर द पुअर या संस्था स्वयंसेवकांनी नासाडी होऊ शकणारे सर्व अन्न आमची संस्था उचलण्यास तयार असुन त्यामूळे या अन्नाची नासाडी होणे थांबू शकते. मात्र यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचं म्हटले आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) गोवा, राज्याचे संचालक FDA चे गोव्यातील प्रमुख आहेत, त्यांनी 'FOOD SHARING ALLIANCE' नावाचा एक अखिल भारतीय उपक्रम सुरू केला असुन. या उपक्रमाद्वारे जास्तीचे अन्न डब्यात साठवले न जाता ते गरजूंना दिले जाण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. याद्वारे ही भरीव काम केले जाऊ शकते.

सांगोल्डा येथील संस्था स्वयंसेवकांनी आंदोलनावेळी म्हटले आहे की, आजपर्यंत जादाचे ताजे अन्न कचऱ्यात फेकले जात आहे, तर भुकेली गरीब कुटुंबे आणि त्यांची कुपोषित मुले दररोज जेवणासाठी भीक मागतायेत. ही विषमता मिटवण्यासाठी दोन्हीमध्ये समन्वय साधला जाणे आवश्यक आहे.

अन्न मिळण्याचा अधिकार हा मूलभूत मानवी हक्क आहे. त्यामूळे आम्ही कोणीही उपाशी झोपू नये यासाठी प्रयत्न करत असुन विशेषत: जास्त प्रमाणात खाण्यायोग्य अन्नाची नासाडी होण्याऐवजी हे अन्न उपासमारी होणाऱ्यांच्या मुखात जावे अशी आमची भुमिका असल्याचं ते म्हणाले.

आमचा लढा गरिबी आणि उपासमारीशी

आमचा लढा गरिबी आणि उपासमारीच्या विरोधात आहे, कोणा एका व्यक्तीविरुद्ध नाही म्हणून आम्ही संचालक, FDA यांना आवाहन करतो की त्यांनी सर्व भागधारकांना त्यांचे अतिरिक्त अन्न सामायिक करण्यासाठी टेबलवर आणावे जे फूड बँक फॉर द पुअर, सांगोल्डा, संकलन आणि वितरण करण्यास उत्सुक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com