New Borim Bridge Dainik Gomantak
गोवा

New Borim Bridge: खाजन शेतीला फटका बसणार, नवीन बोरी पुलाच्‍या प्रस्तावित जागेला विरोध; ग्रामस्थ NGT त धाव घेणार

New Borim Bridge: यापूर्वी मिसिंग लिंक रस्‍ता बांधताना या भागातील सात खाजन शेत जमिनीची नासाडी झाली होती.

सुशांत कुंकळयेकर

New Borim Bridge

जुवारी नदीवरील नवीन बाेरी पूल बांधण्‍यासाठी जी जागा निश्र्‍चित केली आहे त्‍या जागेला लोटलीतील शेतकर्‍यांनी विरोध केला असून या जागेत पूल बांधण्‍यास नदीकाठी असलेल्‍या खाजन शेतीवर त्‍याचा विपरित परिणाम होणार असल्‍याचा दावा केला आहे.

या प्रस्‍तावाला विरोध करण्‍यासाठी प्रसंगी आम्‍ही एनजीटीकडे किंवा उच्‍च न्‍यायालयात दाद मागू असा निर्धार आज लोटलीच्‍या ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केला.

नवीन बाेरी पुलासाठी जागा आरेखित करण्‍यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे अधिकारी आज लोटलीत येणार अशी माहिती मिळाल्‍यानंतर ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने या नियोजित जागी एकत्र झाले होते. त्‍यात ९५ वर्षाच्‍या वृद्धाचाही समावेश होता. पोलीस बंदोबस्‍तात हे आरेखन प्रक्रिया पार पाडली जाणार असे सांगितले गेले होते. मात्र मोठ्या प्रमाणावर लोक जमल्‍यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या अधिकार्‍यांनी तेथे येणे टाळले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आल्‍बर्ट पिन्‍हेरो यांनी, आमचा बोरी पुलाला विरोध नाही मात्र हा पूल बांधण्‍यासाठी जी जागा निश्र्‍चित केली आहे त्‍याला आमचा विरोध आहे. यापूर्वी मिसिंग लिंक रस्‍ता बांधताना या भागातील सात खाजन शेत जमिनीची नासाडी झाली होती.

आता पूल बांधण्‍यासाठी जर या जागेचा वापर करणार असतील तर मोठ्या प्रमाणावर खाजन जमिनी बुजून जाणार आणि या खाजन शेत जमिनीवर पोट भरणार्‍या शेतकर्‍यांच्‍या पोटावर त्‍यामुळे पाय दिल्‍यासारखे होईल असे त्‍यांनी सांगितले.

या ग्रामस्‍थांबरोबर गावचे सरपंच फ्रान्‍सिस्‍को फर्नांडिस आणि उपसरपंच सेलिना बोर्जिस हेही उपस्‍थीत होते. नव्‍या बोरी पुलासाठी जागा निश्र्‍चित करताना सार्वजनिक बांधकाम खात्‍याने स्‍थानिक पंचायतीला अंधारात ठेवले असा आरोप त्‍यांनी केला.

स्‍थानिकांना विश्र्‍वासात घ्‍या: विजय

नवीन बोरी पुलाच्‍या प्रस्‍तावित जागेला लोटलीसह बोरीच्‍या स्‍थानिक लोकांनीही विरोध केला आहे. या जागेत पूल आल्‍यास खाजन शेतजमिनी नष्‍ट होतील अशी शेतकर्‍यांना भीती आहे.

त्‍यामुळे स्‍थानिकांना विश्र्‍वासात घेऊनच सरकारने हे काम पुढे न्‍यावे अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली. खाजन शेत जमिनी ही आमची परंपरा आहे. आणि त्‍या राखून ठेवणे गरजेचे आहे.

बोरी पुलाला कुणाचाही विराेध नाही. मात्र हा पूल स्‍थानिकांवर बळजबरीने थोपविला जाऊ नये असे सरदेसाई म्‍हणाले. या पुला संदर्भात सरकारने लोकांच्‍या विरोधात भूमिका घेतली तर लोकांबरोबर रस्‍त्‍यावर उतरुन या प्रकल्‍पाला आपण विरोध करु असे सरदेसाई म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT