Dhvani Bhanushali In Goa: इथले अन्न, पाणी, हवा मला आवडते; बेबी गर्ल म्हणते 'आय लव्ह गोवा'

Dhvani Bhanushali In Goa: गोव्याबद्दल माझ्या लहानपणापासूनच्या आठवणी आहेत. प्रत्येक वेळी मित्रांसोबत गोव्यात माझा वेळ खूप छान गेला आहे.
Dhvani Bhanushali
Dhvani BhanushaliDainik Gomantak

Dhvani Bhanushali In Goa

नै ना मिलायके, थँक्यू गॉड या सोशल मीडियावर सध्या ट्रेडिंग असलेल्या गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली ध्वनी भानुशाली एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हल्लीच गोव्यात होती.

तिचे इंटरनेटवरील पहिलेच गाणे ‘वास्ते (2019)’ हे त्याकाळी विश्वस्तरावरील पहिल्या 200 गाण्यांमधील एक होते. लेजा रे, इशारे तेरे, बेबी गर्ल, नयन अँड राधा या तिच्या गाण्यांनी देशात तिचा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. बेबी गर्ल हे गाणे तर संपूर्णपणे गोव्यातच शूट झाले आहे.

तिच्या गोव्याच्या ट्रिपबद्दल बोलताना ती सांगते की तिला इथले वातावरण खूप आवडते. ‘इथे खूप शांतता आहे.

प्रत्येक वेळी मी जेव्हा इथे येते तेव्हा इथल्या आरामदायी वातावरणात सुखावलेले माझे शरीर मंदपणे श्वास घेत सौंदर्याचा आस्वाद घेत राहते- या जागेतच असे काहीतरी आहे. इथले लोक उबदार आहेत. इथले अन्न पाणी आणि हवा मला खरोखर आवडते.

गोव्याबद्दल माझ्या लहानपणापासूनच्या आठवणी आहेत. प्रत्येक वेळी मित्रांसोबत गोव्यात माझा वेळ खूप छान गेला आहे. आय लव्ह गोवा.’

Dhvani Bhanushali
Goa: गोव्यातील फार्मा कंपन्यांसाठी पुणे, मुंबईत मुलाखती घेण्यावरुन वाद का झाला? विरोधकांनी उठवले रान

गोव्यात शूट झालेल्या ‘बेबी गर्ल’ या तिच्या व्हिडिओसंबंधी बोलताना ती सांगते, ‘तो संपूर्ण व्हिडिओ गोव्याच्या नयनरम्यतेमुळे आकर्षक बनला. एकूणच बेबी गर्लला लाभलेल्या गोव्याच्या योगदानामुळे माझ्या करिअरलाही फायदा झाला.

मी जेव्हा गोव्याला पुन्हा भेट देईन तेव्हा कदाचित आम्ही मिळून गाण्यांचा संच बनवू अशी मला खरोखरच आशा आहे.’

गोव्याच्या सौंदर्याबद्दल बोलताना, गोव्यात निर्माण होणाऱ्या कचऱ्याबद्दलही ती संवेदनशीलतेने बोलते. आपण अशा बाबींबद्दल जागृत असायला हवे असे तिला वाटते.

ती म्हणते, ‘दरवर्षी लाखो लोक गोव्यात येतात हे विलक्षण आहे. गोवा अजूनही आकर्षक आहे म्हणूनच माझ्यासारख्या, गोव्यात न राहणाऱ्या आम्हा सर्वांनी गोव्यासंबंधी सजग असायला हवे.’

Edited By - किंबर्ली कुलासो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com