Khazan Land Goa Dainik Gomantak
गोवा

Khazan Land: शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब! खाजन जमिनींच्या आम्लतेत होतेय वाढ; भातशेती, इतर उत्पादने धोक्यात येण्याची शक्यता

Khazan Land Acidity Issues: सरकार तसेच समाजाने एकत्रितपणे कार्य केल्यासच यातून मार्ग निघू शकतो, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Khazan Farming Acidity Issues

पणजी: गोव्यातील खाजन जमिनींचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले आहे, की खाजन जमिनीत केवळ क्षारताच नव्हे तर लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असल्याने मातीच्या आम्लतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे किनारी कृषी संशोधन केंद्र जुने गोवे येथील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन शास्त्रज्ञ डॉ. सुजित देसाई यांनी सांगितले.

गोवा खाजन कार्यशाळेत डॉ. देसाई मार्गदर्शन करत होते. दरम्यान, खाजन शेतीवर हवामान बदल, समुद्रपातळीतील वाढ, खारे पाणी शेतीत येणे आदी समस्या उद्भवत असून त्यामुळे भातशेती किंवा इतर पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. योग्य ती पावले उचलणे काळाची गरज आहे. सरकार तसेच समाजाने एकत्रितपणे कार्य केल्यासच यातून मार्ग निघू शकतो, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, खाजन शेतीची क्षारता तसेच आम्लता कमी करण्यासाठी योग्य ते उपाय करणे गरजेचे आहे. खारट पाणी शेतीत येणार नाही यासाठी योग्य ती बांध व्यवस्था असणे गरजेचे आहे. आता खारफुटीदेखील शेतीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यामुळे योग्य ते उपाय शोधणे, कमी काळात अधिक उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या अर्थार्जनातदेखील वाढ करण्यासाठी आमच्या संस्थेद्वारे काही प्रमाणात संशोधन होत असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.

खाजन जमिनींच्या संजीवनीसाठी उपाय

खाजन शेतजमिनीत केवळ भात पिकाचे उत्पादन नव्हे तर भाजीपाला व इतर पिके घेणे गरजेचे आहे.

मीठागरांचे तसेच खाजन शेतीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

खाजन पर्यटनाला चालना देणे योग्य ठरेल.

खाजन शेतीत मत्‍स्यपालनाच्या माध्यमातूनदेखील खाजन शेतकऱ्यांना चालना देणे गरजेचे आहे.

खाजन शेतीचे संगोपन, संवर्धन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सरकार आणि नागरिकांच्या सहयोगानेच शक्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT