Khazan Land: खाजन शेतीतही बेकायदेशीर बांधकामे, कामरखाजन येथील प्रकार; पालिकेकडून पाहणी
Illegal Constructions in Khazan LandDainik Gomantak

Khazan Land: खाजन शेतीतही बेकायदेशीर बांधकामे, कामरखाजन येथील प्रकार; म्हापसा पालिकेकडून पाहणी

Illegal Constructions in Khazan Land: कामरखाजन-म्हापसा येथील मलनि:स्सारण प्रकल्पाजवळील खाजन शेतीत बेकायदेशीर मातीचा भराव टाकून उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची म्हापसा पालिकेने पाहणी केली.
Published on

म्हापसा: कामरखाजन-म्हापसा येथील मलनि:स्सारण प्रकल्पाजवळील खाजन शेतीत बेकायदेशीर मातीचा भराव टाकून उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची म्हापसा पालिकेने पाहणी केली. ‘कामरखाजनाचो बांध टेनंट असोसिएशन’च्या तक्रारीनुसार पालिका अभियंता व निरीक्षकांनी दुसऱ्यांदा ही पाहणी केली.

याबाबत स्थानिक जॉन लोबो म्हणाले की, कामरखाजन परिसरातील सखल भागात काहींनी जाणीवपूर्वक माती टाकून बांधकामे उभी केली आहेत. मुळात खाजन क्षेत्रात बांधकामास परवानगी नसते. तरीही लोकप्रतिनिधींसह काहींनी या ठिकाणी बांधकामे थाटली आहेत. परिणामी, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. याप्रकरणी वेळोवेळी आम्ही संबंधित यंत्रणांकडे तक्रारी केल्या आहेत.

Khazan Land: खाजन शेतीतही बेकायदेशीर बांधकामे, कामरखाजन येथील प्रकार; पालिकेकडून पाहणी
Khazan Land: खाजन जमीनींची सद्यस्थिती दयनीय; नदी पात्रात विलीन होण्याचा धोका, परप्रांतीयांचा शिरकाव

सात बांधकामांना पालिकेने बजावली नोटीस

मुळात बेकायदा बांधकामांबाबत तक्रारी करायला स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात. उलट बेकायदा प्रकारांना चालना देणारे खुशाल बांधकामे भाड्याने देऊन बिनधास्त असतात, अशी खंत जॉन लोबो यांनी बोलून दाखविली. एकूण आठ ते दहा बांधकामे आहेत. त्‍यातील सातजणांना अतिक्रमण करून मातीचे भराव टाकून जमीन बुजविल्याप्रकरणी पालिकेने नोटिसा काढल्या आहेत. सरकारने यापुढे आरोग्य कायद्याखाली कुणालाही सरसकट वीज व नळजोडण्या देऊ नये अशी मागणी लोबो यांनी केली.

Khazan Land: खाजन शेतीतही बेकायदेशीर बांधकामे, कामरखाजन येथील प्रकार; पालिकेकडून पाहणी
New Borim Bridge: आमच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करु नका; बोरी पुल बांधकामाबाबत शेतकऱ्यांची मागणी

उषा अब्रुक, कामरखाजन-म्हापसा

मुळात खाजन शेती ही भावी पिढ्यांसाठी राखून ठेवली पाहिजे. काहींनी आमच्या शेतात अतिक्रमण करून बांधकामे उभी केली. तसेच वॉशिंग सेंटर उघडली आहेत. हे अतिक्रमण आहे. न्यायालयाने महामार्गालगत अतिक्रमण केलेल्या बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com