Baina fish market vendors protest Goa Dainiak Gomantak
गोवा

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Khariwada Wholesale Fish Sale: खारीवाडा येथे घाऊक मासे विक्री करणारे विक्रेते बायणातील मासे मार्केटात जाण्यास अनुत्सुक असल्याने मुरगाव पालिका मंडळाने घेतलेला निर्णय बारगळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: खारीवाडा येथे घाऊक मासे विक्री करणारे विक्रेते बायणातील मासे मार्केटात जाण्यास अनुत्सुक असल्याने मुरगाव पालिका मंडळाने घेतलेला निर्णय बारगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्केटाची दुरुस्ती करण्याच्या हालचाली थंडावल्याचे दिसून येत आहे.खारीवाडा येथे काहीजण घाऊक दराने (किलो पध्दतीने) मासे विक्री करतात. त्यामुळे तेथे मासे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते.

तसेच बोटीद्वारा सायंकाळच्या वेळी मासेमारी करून आलेले संबंधित तेथे मासे विकतात. ताजे व किलो पध्दतीने मिळणाऱ्या माशांना ग्राहकांची अधिक पसंती आहे. खारीवाडा येथे घाऊक पध्दतीने मासे विक्री करण्यास शहर भागातील मासे मार्केटातील मासे विक्रेत्यांची हरकत आहे. त्यामुळे काही वेळा वादही निर्माण झाले होते. काही वेळा पोलिस व मुरगाव पालिकेने कारवाई करताना खारीवाडा येथील घाऊक मासे विक्री बंद केली होती.

मासे जप्तही करण्याची कृतीही केली होती. तथापि तेथील मासे विक्री थांबली नाही. शहर भागातील मासे मार्केट इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर मासे विक्रेत्यांनी तेथे जाण्यास नकार दिला होता. आधी खारीवाडा येथील घाऊक मासे विक्री बंद करा, त्यानंतरच आम्ही नवीन मार्केटात मासे विक्री करू, असा पवित्रा घेतला होता.त्यामुळे खारीवाडा येथे घाऊक पध्दतीने मासे विक्री होऊ नये यासाठी तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे तेथील मासे विक्री पूर्णपणे बंद झाली होती. परंतु नवीन मासे मार्केटात व्यवसाय सुरू झाल्यावर खारीवाडा येथे पुन्हा मासे विक्री सुरू झाली होती. त्यामुळे मार्केटातील मासे विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला होता.

खारीवाडा येथील मासे विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आवाहन मार्केटातील मासे विक्रेत्यांनी केले होते. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी २२ एप्रिलला वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्यासमावेत एका संयुक्त बैठक घेण्यात आली होती. याप्रसंगी मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक, नगरसेविका, पोलिस अधिकारी, खारीवाडा येथे मासे विक्री करणारे विक्रेते व इतर संबंधित उपस्थित होते. यावेळी खारीवाडा येथे घाऊक पध्दतीने मासे विक्री करणाऱ्यांची सोय बायणातील मासे मार्केटात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बायणातील मासे मार्केट अधिसूचित करण्यात आल्याने त्या मार्केटपासून एक किलोमीटर अंतराच्या परिघात कोणालाही मासे विक्री करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. बायणातील मासे मार्केटापासून एक किलोमीटर अंतरामध्ये मासे विक्री करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी तसेच बायणातील मार्केटाची दुरुस्ती करण्यासंबंधीही निर्णय घेण्यात आले होते. बैठकीला हजर घाऊक मासे विक्रेत्यांनी बायणा मासे मार्केटात जाण्याची तयारी दर्शविली होती.

ग्राहक तुटण्याची भीती असल्यानेच!

खारीवाडा येथे गेली काही वर्षे घाऊक मासे विक्री होत असल्याने तेथे ग्राहक येतात. परतुं बायणा मासे मार्केटात स्थलांतर केले तर ग्राहक तुटण्याची भीती संबंधित मासे विक्रेत्यांना वाटत आहे. त्यामुळे ते विक्रेते तेथे जाण्यास राजी नसल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT