Kharebandh Lake Overflow Dainik Gomantak
गोवा

बाणावलीत तुफान पाऊस; खारेबांध तलाव ओव्हरफ्लो

वेस्टर्न बायपासच्या कामांमुळे पुराचा धोका वाढला आहे.

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात सुरु असलेल्या अविश्रांत पावसामुळे खारेबांध येथील तळे काठोकाठ भरले आहे. याच परिसरात सुरु असलेल्या वेस्टर्न बायपासच्या कामांमुळे पुराचा धोका वाढला आहे. आधीच दक्षिण गोव्यात पावसामुळे पूरस्थिती दिसून येत आहे, त्यातच खारेबांध तळं भरल्यामुळे बाणावलीच्या आमदारांसह पर्यावरणप्रेमींतून चिंता व्यक्त केली आहे

पावसाने कालपासून जोर धरल्याने राज्यात बऱ्याच ठिकाणी पाणी भरण्याचे प्रकार वाढले आहेत. दक्षिण गोव्यातही मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असून दरवर्षीप्रमाणे गुडी पारोडा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पारोडा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे.

केपे ते मडगाव हा मुख्य रस्ता पर्वत पारोडा येथे पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक चांदर मार्गे वळविण्यात आली आहे. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता पारोडा येथे रस्ता पाण्याखाली गेला, तसेच पारोडा येथील कुशावती नदीवरील पूलही पाण्याखाली गेल्याने तो रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

गोव्यात पावसाने दाणादाण उडवून दिली असतानाच मागच्या वर्षीपेक्षा यंदा 13 टक्के जास्त पाऊस पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. 1 जून ते 5 जुलैदरम्यान राज्यात एकूण 47.36 इंच पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस गेल्यावर्षी याच काळात पडलेल्या पावसापेक्षा सरासरी 13 टक्क्यांनी जास्त आहे.

दुसरीकडे गोव्यात पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने भूस्खलन, वाहतूक कोंडी, पूर आणि मालमत्तेचं नुकसान होत आहे. आयएमडीने 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र आणखी दोन दिवस परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मागील अंदाजानुसार, 5 ते 9 जुलै दरम्यान गोव्यात अति मुसळधार पावसाची (>11.5cm) शक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मच्छिमारांना 5 दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

SCROLL FOR NEXT