Goa of Bihar, Kharauna Canal Bihar  Dainik Gomantak
गोवा

Goa of Bihar: बिहारमधला 'गोवा'! राज्य सरकारची जोरदार जाहिरातबाजी, ‘खरौना कॅनॉल’ होतोय Viral

Kharauna Canal Bihar: गोवा म्हणजे समुद्रकिनारे, शांत वातावरण आणि एक अद्वितीय पर्यटन अनुभव. पण आता गोव्याच्या या गोंडस प्रतिमेला बिहारकडून जोरदार टक्कर दिली जात आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा म्हणजे समुद्रकिनारे, शांत वातावरण आणि एक अद्वितीय पर्यटन अनुभव. पण आता गोव्याच्या या गोंडस प्रतिमेला बिहारकडून जोरदार टक्कर दिली जात आहे. मुजफ्फरपूरजवळील ‘खरौना कॅनॉल’ हे ठिकाण सध्या ‘बिहारचे गोवा’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

बिहार सरकारच्या पर्यावरण पर्यटन धोरणाचा भाग म्हणून विकसित होत असलेला हा निसर्गरम्य परिसर थंड वाऱ्याचा स्पर्श, झाडांची सावली आणि प्रवाही जलधारा यामुळे पर्यटकांचे आकर्षण बनत चालला आहे. अगदी कमी खर्चात, गर्दीपासून दूर आणि शहराच्या अगदी जवळ असा विरंगुळ्याचा अनुभव हवा असेल तर खरौना कॅनॉल गोव्याला पर्याय ठरत आहे.

बिहार सरकारने आपल्या संकेतस्थळावर ‘बिहारमधील गोवा’ अशी या भागाची जोरदार जाहिरातबाजी चालवली आहे.

जलक्रीडा अन्‌ थंडीचा अनुभव

महागडी ट्रिप्स परवडत नसतील तर खरौना कॅनॉल हे अगदी गोव्यासारखे अनुभव देणारे स्थान बनत आहे. इथं तुम्ही पोहू शकता, जलक्रीडा करू शकता किंवा फक्त पाण्याच्या काठावर निवांत बसून थंडीचा अनुभव घेऊ शकता, अशी सरकारी जाहिरात सांगते.

बिहारच्‍या पर्यटन विभागाकडून तेथे स्वच्छता, सुविधा, सुरक्षितता यासाठी नानाविध योजना राबवल्या जात आहेत. स्थानिक विक्रेत्यांनीही यामुळे उत्साहाने खाद्यपदार्थ विक्री सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT