Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

Aligarh Murder Case Over Money: उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली.
Aligarh Murder Case Over Money
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली. केवळ 20 हजार रुपयांच्या वादातून एका तरुणाची त्याच्याच जवळच्या नातेवाईकांनी निर्घृण हत्या केली. पैशांच्या व्यवहारावरुन सुरु झालेला हा कौटुंबिक वाद इतक्या थराला गेला की, चक्क सख्ख्या बहिणीने आणि मेहुण्याने मिळून या तरुणाचा काटा काढला. या घटनेने संपूर्ण अलिगढ शहर हादरुन गेले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय अफसार असे मृत तरुणाचे नाव असून, तो अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसजवळ एक कॅन्टीन चालवत होता. अफसारने काही आठवड्यांपूर्वी आपली बहीण शहनाज आणि मेहुणा इमरान यांना 20 हजार रुपये उसने दिले होते. गेल्या काही दिवसांपासून अफसार आपल्या पैशांची मागणी करत होता, मात्र हीच मागणी त्याला महाग पडली. बहिणीला आणि मेहुण्याला आपल्या हक्काचे पैसे परत मागणे इतके झोंबले की त्यांनी अफसारला संपवण्याचा कट रचला.

Aligarh Murder Case Over Money
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

शुक्रवारी उशिरा रात्री अफसार आपले कॅन्टीन बंद करुन घरी परतत असताना वाटेत हल्लेखोरांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अफसारला तातडीने जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, परंतु जखमा गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Aligarh Murder Case Over Money
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

या हत्येच्या वेळी अफसारच्या घरात अत्यंत करुण परिस्थिती निर्माण झाली. अफसारची पत्नी सध्या गरोदर असून पतीच्या मृत्यूची बातमी मिळताच ती बेशुद्ध पडली. अफसारला आधीच 7 आणि 5 वर्षांच्या दोन लहान मुली आहेत. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या अफसारच्या जाण्याने त्याच्या पत्नीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. "आता आमच्या कुटुंबाला कोण सांभाळणार?" असा सवाल विचारत तिने हंबरडा फोडला. अवघ्या 20 हजार रुपयांच्या किरकोळ रकमेसाठी एका कुटुंबाचा हसता-खेळता आधार हिरावला गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Aligarh Murder Case Over Money
Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी विवाहितेला जाळले; पळून जाणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी

पोलिसांनी (Police) याप्रकरणी तातडीने कारवाई करत अफसारची बहीण शहनाज आणि तिच्या तीन मुलांना अटक केली. मात्र, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला मेहुणा इमरान हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. नात्यातील विश्वास आणि माणुसकी पैशांपुढे कशी फिकी पडते, याचे हे विदारक उदाहरण समोर आले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com