Khandola Dainik Gomantak
गोवा

Khandola News : कुंभारजुवेत जोडरस्ता कामाचा शुभारंभ; आमदार फळदेसाई यांचे प्रयत्न

Khandola News : पायाभरणी केल्यानंतर नुकताच आमदार फळदेसाई यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्‍वासन फळदेसाई यांनी दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News :

खांडोळा, गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष तथा कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी पुढाकार घेऊन कुंभारजुवे ते गवंडाळी पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम स्वखर्चाने - सुरू केले आहे.

पायाभरणी केल्यानंतर नुकताच आमदार फळदेसाई यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्‍वासन फळदेसाई यांनी दिले.

२०१६ पासून हे काम प्रलंबित होते, यामुळे कुंभारजुवेतील लोकांची गैरसोय होत होती. कुंभारजुवे-गंवडाळी पूल होऊनसुद्धा कुंभारजुवेवासीयांना पुलामार्गे जाण्यासाठी माशेल माडापैमार्गे पूल गाठावा लागत आहे.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हे काम पूर्ण करण्याची गरज होती, त्यामुळेच प्राधान्य देऊन स्वखचनि हा जोड रस्ता करण्याची पूर्ण जबाबदारी घेतल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

फळदेसाई म्हणाले, शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन या कामासाठी सहकार्य मागितल्याचे त्यांनी सांगितले. गावाच्या हितासाठी अशा कामांना शेतकरी नेहमीच पाठबळ देण्यास तयार असतात. मुख्यमंत्र्यांना या कामाची माहिती देण्यात आली होती.

तरीकाही प्रक्रियेसाठी वेळ लागतो, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करता यावे,. यासाठी स्वतःहून काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचा फायदा कुंभारजुवे येथील ग्रामस्थांना होणार आहे.

ग्रामस्थांना वरदान

सरपंच नंदकुमार शेट म्हणाले, मंगळवारपासून या कामाला सुरुवात झाली. या रस्त्याचा फायदा कुंभारजुवे येथील ग्रामस्थांना होणार आहे. विकासासाठी ''लोकाभिमुख आमदार पुढे आले आहेत. प्रवाशांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT