Khandola  Dainik Gomantak
गोवा

Khandola News : देशहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज : ब्रह्मेशानंदाचार्य

Khandola News : तपोभूमीत हिंदूधर्म कार्यकर्ता सभेत मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News :

खांडोळा, आपल्या देशाला अध्यात्माचा वारसा असून विविध सांस्कृतिक परंपरा आहेत, देशहितासाठी त्यानुसार वाटचाल करणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत बह्मेशानंदाचार्यांनी तपोभूमी येथे हिंदूधर्म कार्यकर्ते सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, भारतीय संस्कृतीने धर्माला, अध्यात्माला प्राधान्य दिले. आपला देश ऋषिमुनी, साधुसंतांचा देश आहे. साधुसंतांनी आम्हांला मुक्ती किंवा मोक्ष प्राप्तीसाठीच अध्यात्म दिले. हे अध्यात्म टिकवण्याचे आणि परंपरा सांभाळण्याचे आवाहन आपल्यापुढे आहे.

समाजाने देशाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे. आज समाजाला हिंदुत्वाची ओळख करून देण्याची गरज आहे. देशहिताच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी हा हिंदूधर्म सांभाळायचा आहे आणि भावीपिढीला चांगल्या प्रकारे धर्म सांभाळण्यासाठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे.

जीवनामध्ये ज्या पद्धतीच्या धर्माची स्थापना व्हायला पाहिजे, त्या विचारांनुसार आचरण केले पाहिजे. देशहितासाठी उत्तम नागरिक बनणे गरजेचे आहे, त्यासाठीच अध्यात्माचा वारसा सांभाळावा, असे स्वामींनी शेवटी स्पष्ट केले. व्यासपीठावर श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक मंडळ, सामाजिक विभाग पदाधिकारी व कृपाकांक्षी उपस्थित होते. सूत्रसंचालन महाप्रबंधक शुभक्षण नाईक यांनी केले.

विविध ठराव संमत

या सभेत देव, देश व धर्म या त्रिसूत्रीवर आधारित कार्य व उपक्रमावर विचारविमर्श करून विविध ठराव संमत करण्यात आले. गोव्यातील सर्व तालुक्यातून, खानापूर-बेळगाव व सावंतवाडी अशा विविध भागातून हिंदूधर्म कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते. लोककल्याणासाठी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक व सांकृतिक अशा विविध विषयांवर कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT