Goa News : आसगाव परिसरात नाईट क्लब संस्कृती नको : विश्वजीत राणे

Goa News : पंचायत, टीसीपी करणार बांधकामाची पाहणी
Goa Asgaon
Goa AsgaonDainik Gomantak

Goa News :

म्हापसा आसगाव पंचायत कार्यक्षेत्रातील वादग्रस्त नाईट क्लब संदर्भात आमदार, आसगाव पंचायत मंडळ तसेच ग्रामस्थांनी टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांची मंत्रालयात भेट घेतली. तेव्हा मंत्री राणे यांनी आसगावात क्लब संस्कृती रुजू देणार नाही, असे ठोस आश्वासन संबंधित शिष्टमंडळास दिले.

आता पंचायत व टीसीपीकडून सदर क्लबच्या बांधकामाची संयुक्त पाहणी केली जाणार आहे. आसगाव पंचायत कार्यक्षेत्रातील मुनांगवाडा येथे दाट लोकवस्तीत नाईट क्लब सदृश इमारतीच्या विरोधात संपूर्ण गाव सध्या एकवटला आहे. यानिमित्त मध्यंतरी गावकऱ्यांनी या कथित डिस्को क्लबच्या विरोधात मेणबत्ती फेरी काढली होती.

Goa Asgaon
BJP To Introspect South Goa Defeat: दक्षिणेत पल्लवी धेंपेंचा पराभव का झाला? भाजप कारणांचा शोध घेणार

आसगाव-बादे नागरिक कृती समितीच्या नेतृत्वाखाली या क्लबविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर, शुक्रवारी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, सरपंच हनुमंत नाईक, सुरेंद्र गाड, आयस्टन बॅरेटो, सोमाजी सावंत, सुरेश नाईक आदींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने टीसीपी मंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली.

टीसीपी मंत्री राणेंसोबत बैठक फलदायी ठरली. मंत्र्यांनी आश्वासन दिले की, नाईट क्लबच्या कामात ते लक्ष घालणार आहेत, असे समितीतर्फे सांगण्यात अले.

लोबोंचे सहकार्य!

सुरेंद्र गाड म्हणाले, टीसीपी मंत्र्यांसोबत आमची बैठक फलदायी ठरली. नाईट क्लब संस्कृती रुजल्यास गावपण उद्‍ध्वस्त होईल. तसेच विपरित परिणामांविषयी आम्ही मंत्र्यांना पटवून दिले. ग्रामस्थ, पंचायत तसेच आमदारांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. आमदार दिलायला लोबोंनीच टीसीपी मंत्र्यांसोबत भेट घडवून आणण्याकरिता पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com