Alcohol  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कुर्टी - खांडेपार बगलरस्त्यावर भरतेय तळीरामांची जत्रा !

रात्रभर धुमाकूळ: रस्त्यावरच फोडतात बाटल्या, पथदीप बंदच, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांत घबराट

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime खांडेपार - कुर्टी चौपदरी रस्त्याच्या बगल मार्गांवर तळीरामांची जत्रा भरत असून रात्रभर या मद्यपींच्या पार्ट्या चालतात.

रात्री अर्वाच्च शब्दात शिवीगाळ, आरडाओरड मद्यपींकडून सुरू असते, दारु पिऊन रस्त्यावरच बाटल्या फोडल्या जातात, तर पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची छेड काढली जात असल्याने लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालून कुर्टी - खांडेपार चौपदरी रस्त्याच्या बगलमार्गावर गस्त घालावी आणि मद्यपींचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या बगल मार्गावर पथदीप अधूनमधून लागत नसल्याने त्याचाच फायदा हे बेवडे घेत आहेत.

खांडेपार येथील नवीन चौपदरी पुलाच्या रस्त्यावर तर सहकारी स्पाईस फार्म ते हाऊसिंग बोर्ड कॉलनी व पुढे फर्मागुढी जोडरस्त्यावर ठिकठिकाणी हे बेवडे दारू पीत बसलेले असतात. रात्र झाली की दारुच्या बाटल्या, सोबत चिकन, मटण असा या बेवड्यांचा बेत असतो.

रात्रभर दारू पिऊन हे मद्यपी रस्त्यांवर धिंगाणा घालतात. दारू पिऊन झाल्यावर बाटल्या फोडून हेच लोक धुडघूस घालतात, अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करतात.

त्यामुळे रस्त्यावरून चालत जाणेही इतरांना मुश्‍किलीचे झाले आहे. या मद्यपींचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.

रस्ताभर फुटलेल्या दारुच्या बाटल्या

कुर्टी व खांडेपार जोडरस्त्यांवर ठिकठिकाणी फुटलेल्या दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. काही ठिकाणी तर रिकाम्या दारूच्या बाटल्या इतस्ततः फेकून दिल्या जातात, या रिकाम्या बाटल्या मुख्य रस्त्यावर घरंगळत येत असल्याने दुचाकीस्वारांना गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे या बेवड्यांना आवर घालण्याची गरज आहे.

कुर्टीतील या अंदाधूंद प्रकाराची कल्पना आपल्याला आली आहे. आपल्या कानावर अशा गोष्टी घातल्यामुळे पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रात्रीच्यावेळी तसेच पहाटे पोलिसांनी चौपदरी रस्त्यांवर गस्त घालावी आणि बेवड्यांचा तसेच गांजा, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना पकडण्यासंंबंधी सूचनाही पोलिस खात्याला करण्यात आली आहे. - रवी नाईक, कृषीमंत्री गोवा

अमली पदार्थही...

कुर्टी भागात तर दारूसोबत अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. अशा लोकांना हटकणे म्हणजे जीवावर बेतण्याचा प्रसंग असतो, असे काही लोकांनी सांगितले.

अंमली पदार्थांचे विशेषतः गांजाचे सेवन होत असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास करावा, असेही हाऊसिंग बोर्ड तसेच हवेली, खांडेपार भागातील लोकांनी म्हटले आहे.

महिलांना चेन स्नॅचिंगची भीती

पहाटे बरेच लोक मॉर्निंग वॉकला जातात, त्यावेळेला रस्त्यालगत हे मद्यपी बसलेले असतात. काहीजण दुचाकी चालू करून जोरात आवाज करतात.

आठवड्याभरापूर्वी तर हाऊसिंग बोर्ड कॉलनीसमोरील चौपदरी रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेच्या पाठीवर एका दुचाकीस्वाराने जोरदार धपाटा मारला, त्यामुळे ही महिला खाली पडली, दुचाकीस्वार पळून गेला.

हा प्रकार घडला तेव्हा लोकांची गर्दी नव्हती, पण काहींनी दुरून हा प्रकार पाहून आरडाओरड केली. पण तोवर दुचाकीस्वार पळाला. महिलांना गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावले जाण्याची भीती असून मॉर्निंग वॉकला जाण्यासही घाबरू लागल्याने पोलिसांनीच याप्रकरणी त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

SCROLL FOR NEXT