Ketan Bhatikar Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Association: 'या' कारणास्तव ‘जीसीए’ मधून केतन भाटीकरांना हटवले

संघटना विरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आलेय

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cricket Association गोवा क्रिकेट संघटनेच्या मेडिकल संचालक पदावरून डॉ. केतन भाटीकर यांना हटवण्याचा ठराव केल्याची मोठी बातमी हाती येतेय. संघटना विरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आलेय.

भाटीकर यांना संघटनेच्या आजीव सदस्यपदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय आमसभेत बहुमताने झाल्याची माहिती जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी दिली.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात वावरणारे, संघटनेला बदनाम करणारे डॉ. केतन भाटीकर यांना संघटनेत का ठेवता, अशी विचारणा क्लबांनी रविवारी झालेल्‍या आमसभेत केली. भाटीकर यांच्या बडतर्फीचा कालावधी किती असेल, हे ठरविण्यात येईल.

जीसीए वैद्यकीय संचालकपदावरुनही भाटीकर हटविण्यात आल्याचे विपुल फडके यांनी सांगितले. आमसभेला जीसीए सचिव रोहन गावस देसाई, तसेच अन्य पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

दरम्यान या प्रकरणी निरनिराळ्या प्रतिक्रिया समोर येताहेत. जीसीएचे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांनी मात्र आपण नेहमीच डॉ. केतन भाटीकर यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया दिलीय. भाटीकर हे प्रामाणिकपणे काम करणारे असल्याचे त्यांनी सांगितलंय.

तसेच या सर्व प्रकरण विषयी बोलताना भाटीकर म्हणाले की, पूर्वग्रह ठेऊन आणि राजकारण करून माझ्याबाबत ही गोष्ट होतेय. परंतु जे लोक माझ्यावर, माझ्या कामावर प्रेम करतात, विश्वास दाखवतात ते माझ्यावर प्रेमच करतील आणि जे लोक माझा तिरस्कार करतात त्यांना मात्र या घटनेचा अधिक आनंद होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT