मांद्रे येथील एका घराचे वीजबिल तब्बल 57 लाख रुपये आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार केशव मांद्रेकार यांच्याबाबतीत घडला असून हे सर्व माझ्यासाठी धक्कादायक असल्याचे मांद्रकार यांनी म्हटले आहे.
(Keshav Mandrekar from Mandrem one month electricity bill 57 lakh rupees)
मिळालेल्या माहितीनुसार मांद्रे येथे केशव मांद्रेकार यांचे एक छोटेखानी घर आहे. या घराचे प्रतिमहिना वीजबिल सातशे ते आठशे रुपये येते. मात्र या (नोव्हेंबर ) महिन्याचे वीजबिल हे तब्बल 57,36,285 रु इतके आले आहे. त्यामूळे आपल्याला धक्का बसला आहे असे ते म्हणाले आहेत.
याबाबत माहिती देताना केशव मांद्रेकर म्हणाले की, वीजबिलाचा आकडा पाहून मी विज कार्यालयास भेट दिली. यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी मीटरमध्ये बिघाड झाल्याने असे घडले असावे अशी शक्यता व्यक्त केली. आणि यात लवकरच दुरुस्ती केली जाईल असे म्हटले आहे.
पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये असा प्रकार घडणार नाही असे विज खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र वाढीव बिलाची समस्या कधी सुटणार आहे. याबाबत ते बोलण्यास तयार नाहीत. असे ही मांद्रेकार यांनी म्हटले आहे. त्यामूळे गोवा सरकारचा वीज वितरण विभाग ताततडीने दुरुस्ती करणार का ? हे पाहावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.