Ketan Bhatikar  Dainik Gomantak
गोवा

Ponda: स्वतःचे अस्तिव सिद्ध करण्यासाठी जीद्द हवीच- डॉ. केतन भाटीकर

Ponda: केरी निगळ्ये पूर्वप्राथमिक व प्राथमिक विद्यालयात वार्षिक बक्षीसवितरण सोहळा संपन्न झाला.

दैनिक गोमन्तक

Ponda: शून्यातून विश्‍व निर्माण करण्यासाठी जीद्द असावी लागते. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर ही जीद्द आणि आत्मविश्‍वास त्याचबरोबर प्रामाणिक व्यवहार हेही तेवढेच महत्त्वाचे असून केरीसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेले संदीप निगळ्ये यांनी ही खडतर मेहनत केली, त्यामुळेच तर काल त्यांनी स्वतःचे असे नाव प्रस्थापित केले असे उद्‍गार डॉ. केतन भाटीकर यांनी काढले.

केरी-फोंडा येथील प्रज्ञा शिक्षण संस्थेच्या सुशीलाताई नीळकंठ निगळ्ये पूर्वप्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक बक्षीसवितरण कार्यक्रम झाला, यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप निगळ्ये, सचिव प्रा. सुभाष जाण, खजिनदार प्रभाकर केरकर, सरपंच तृप्ती नाईक, कांचन केरकर, व्यवस्थापक राजेंद्र केरकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजा केरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांती शिरोडकर, मुख्याध्यापिका नेत्रा गावकर व प्रसिद्ध संतुरवादक संदीप चटर्जी आदी मान्यवर उपस्थित होते. निगळ्ये म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच शाळेचेही नाव उज्ज्वल करावे, शिक्षिका सोनाली प्रभुगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

खडतर मेहनत...

आयुष्यात आपण खडतर मेहनत घेतली तर कोणतीही गोष्ट साध्य करणे कठीण नाही, हेच संदीप निगळ्ये यांनी दाखवून दिले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी निगळ्ये यांचा आदर्श समोर ठेवायला हरकत नाही. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे आहे, याची खूणगाठ मनाशी पक्की बांधा, जिद्दीने प्रयत्न करा. त्यादृष्टीनेच प्रयत्न केले तर निश्चितपणे यश प्राप्त होईल, असे भाटीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT