court Dainik Gomantak
गोवा

गाडी चालवताना आला दारुचा वास, गोव्यात Drink & Drive प्रकरणी केरळचा नागरिक दोषी; कोर्टाने ठोठावला 10,000 दंड

Goa Court Verdict: दारुच्या नशेत गाडी चालवल्याप्रकरणी केरळच्या नागरिकाला म्हापसा न्यायालयाने दोषी ठरवून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Pramod Yadav

म्हापसा: दारुच्या नशेत वाहन चालविल्याप्रकरणी केरळचा नागरिक दोषी आढळला आहे. म्हापसा न्यायालयाने संबधित व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास १० दिवसांची साधी कैद भोगावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या वाहन चालकाला पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली. यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले होते. संशयावरुन पोलिसांनी वाहन चालकाची मशीनच्या मदतीने तपासणी केली असता, त्याच्या रक्तात ११९.१ एमजी/ १०० मिली दारुचे प्रमाण आढळून आले होते.

तसेच, चालकाने वाहन चालवत असताना सीट बेल्ट देखील घातला नव्हता. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला होता. मोटर वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १८५ अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करुन प्रकरण न्यायालयात दाखल झाले.

सुनावणी दरम्यान, चालक दोषी आढळून आला असून, कोर्टाने चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास चालकाला दहा दिवसांच्या साध्या कैदेत ठेवले जाईल. दारु पिऊन वाहन चालवने कायद्याने गुन्हा आहे. दारुच्या नशेत वाहन न चालविण्याचे आवाहन सरकार आणि पोलिसांकडून केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT