Kejriwal to make big announcement for women in Goa today  Dainik Gomantak
गोवा

केजरीवाल आज गोव्यातील महिलांसाठी करणार मोठी घोषणा

नावेलीतआज होणाऱ्या महिला मेळाव्‍यात ते महिलांसाठी चांगल्‍या योजनांची घोषणा करतील

दैनिक गोमन्तक

वास्को: सरकारतर्फे (Goa Government) महिलांसाठी राबविण्‍यात येणाऱ्या सामाजिक योजनांचे पैसे त्‍यांना वेळेवर मिळत नाहीत. याबाबत दिरंगाई करून सरकार एकाप्रकारे महिलांचा छळ करीत आहे, असा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे (Rahul Mhambre) यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्‍याबरोबरच त्यांना स्वावलंबी होण्यासाठीही सहकार्य करणार आहे. नावेलीतआज होणाऱ्या महिला मेळाव्‍यात ते महिलांसाठी चांगल्‍या योजनांची घोषणा करतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

केजरीवाल यांचे शनिवारी दाबोळी विमानतळावर स्‍वागत केल्‍यानंतर म्‍हांबरे बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर, परशुराम सोनुर्लेकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केजरीवाल दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आले असून आज ते नावेली येथे महिला मेळाव्याला संबोधित करणार आहेत. म्हांबरे म्हणाले की, राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबविण्‍यात आलेल्‍या योजना हा फक्त देखावा आहे. म्‍हणूनच ‘आप’ने गोव्यातील महिलांसाठी अनेक योजना राबविण्याचा संकल्‍प केला आहे. त्याची विस्‍तृत माहिती केजरीवाल आज देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT