Neelkanth Halankar Dainik Gomantak
गोवा

Goa Cleaning Campaign: राज्यात पर्यटनवाढीसाठी समुद्रकिनारे स्वच्छ ठेवा!

टेम्बवाडा मोरजी येथे आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रम..

दैनिक गोमन्तक

समुद्र किनारा स्वच्छ ठेवला, तर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने स्वच्छतेमुळे किनारी येऊ शकतात, त्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता सर्व नागरिकांनी आपापल्या परिसरातील समुद्रकिनाऱ्याबरोबरच परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन मच्छीमार मंत्री नीळकंठ हळणकर (Fisheries Minister Neelkanth Halankar) यांनी टेम्बवाडा मोरजी येथे आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमप्रसंगी केले.

माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धी आरोलकर, सरपंच सुरेखा शेटगावकर, उपसरपंच पवन मोरजे, पंचसदस्य सुप्रिया पोके, रजनी शिरोडकर, मुकेश गडेकर, उपसरपंच पवन मोरजे, पंच फोटू शेटगावकर, विलास मोरजे, स्वप्निल शेटगावकर, मंदार पोके, विद्याप्रसारक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीप मेथर, पीटर आलवारीस हायस्कूलचे मुख्याध्यापक नाजारेथ फनांडीस, पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, पेडेणे मामलदार अनंत मळीक, पेडणे भाग शिक्षणाधिकारी छाया पेडणेकर अमृतसिंग, धवरुख संस्थेचे रुद्रेश म्हामल, राजेंद्र भोबे आधी उपस्थित होते. श्रेया पडते यांनी सूत्रसंचालन केले.

दयानंद सोपटे म्हणाले, किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी, ज्या पद्धतीने सरकारची त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाची व किनारी भागात येणाऱ्या पर्यटकांचीही आहे. सिद्धी आरोलकर, पंच मुकेश गडेकर यांनी मोहिमेबाबत माहिती दिली. या मोहिमेत अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पंचायत मंडळ नागरिक सहभागी झाले होते. या मोहिमेत किनारी भागातील सर्व प्रकारचा कचरा उचलण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT