Mahadayi Water Dispute | D. K. Shivkumar | Karnataka vs Goa Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईबाबत गोव्याला आश्वासन, मग कर्नाटकचे काय? पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी...

कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा सवाल

Akshay Nirmale

Mahadayi Water Dispute: म्हादई प्रश्नी गोव्याच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आता कर्नाटकातूनही म्हादई प्रश्नाबाबत पडसाद उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरूवारी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभुमीवर कर्नाटकमधील काँग्रेसन नेते डी. के. शिवकुमार यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावरून कर्नाटकला म्हाईदबाबत काहीच दिलासा नाही का, याबाबत पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, असा सवाल केला आहे.

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, म्हादई प्रश्नाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सकारात्मक आश्वासन दिल्याचे कळते. मग या मुद्याबाबत कर्नाटकला काहीच आश्वासन नाही का? भाजप सरकार कर्नाटकचा हक्क उघडपणे डावलत आहे का? असे सवाल डी. के. शिवकुमार यांनी केले आहेत. कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत बोलावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

म्हादई प्रश्नी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील इतर मंत्र्यांच्या शिष्टिमंडळासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी भेट घेतली. म्हादईविषयी गोव्याची बाजू शिष्टमंडळाने सविस्तरपणे अमित शाह यांच्यासमोर मांडली. म्हादई प्रश्नात लक्ष घालू, असे आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचे सांगण्यात आले होते.

कळसा आणि भांडुरा या म्हादईच्या उपनद्यांचे पाणी वळविण्यासाठी केंद्रीय जलआयोगाने कर्नाटकाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) दिलेली मंजुरी रद्द करावी, तसेच म्हादई पाणी प्राधिकरण स्थापन करावे अशा मागण्यांचे निवेदन यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने अमित शाह यांना देण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Tiger Reserve Controversy: नेत्रावळीतील समस्‍या कधी सोडविल्‍या का? व्‍याघ्र प्रकल्‍पावरून केवळ निर्बंध थोपवले; वास्‍तव तपासा, ग्रामस्‍थांची मागणी

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT