Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रक्ररणी कर्नाटकचा युवक ओल्ड गोवा पोलिसांच्या ताब्यात

महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे

Kavya Powar

राज्यात गुन्हेगारीला ऊत आला असून यामध्ये प्रामुख्याने महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.

याबाबत मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर ओल्ड गोवा पोलिसांनी घटनेचा तपास करत अपहरण केल्याप्रकरणी अविनाश राठोड (21) या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश हा मूळचा कर्नाटकमधील रहिवासी असून तो सध्या गोव्यातच वास्तव्याला आहे. काही काळापासून तो पीडित मुलीवर पाळत ठेऊन होता. दरम्यान, तिच्याशी बोलण्याची संधी शोधून त्याने तिच्याशी जवळीक वाढवली.

पीडितेला खोटी आश्वासने देऊन त्याने तिचे अपहरण केले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत त्याच्यावर भादंसंनुसार कलम 363 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, ओल्ड गोवा पोलीस संबंधित घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT