Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Accident in Goa : वरूणापुरी जंक्शन येथे कर्नाटकच्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; डीफेन्स कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

स्थानिकांच्या गर्दीने घटनास्थळी तणाव

Akshay Nirmale

Goa Accident: मुरगाव तालुक्यातील वरुणापुरी जंक्शन येथे झालेल्या भीषण अपघातात एका संरक्षण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अरविंद पासवान असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पासवान हे त्यांच्या बाईकवरून (GA O6 R 8173) चालले होते.

त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (KA 63 2716) त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर येथे तणाव वाढला होता. हेडलँड सडा येथून हा ट्रक आला होता. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, स्थानिकांनी येथे गतीरोधक बसविण्याची मागणी केली. गतीरोधक न केल्यास येथून वाहतूक करू देणार नाही, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. वाहनधारक येथून बेदरकारपणे वाहने हाकत असतात.

येथे लोकवस्ती आहे. लहान मुळे खेळत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुरगाव पोर्टमुळे होणाऱ्या वाहतुकीमुळे वारंवार अपघात आहेत, त्यातून गोव्याला महसूल काही मिळत नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT