Mangaluru-Madgaon Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

मंगळुरु-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा; जाणून घ्या महत्वाची अपडेट

वंदे भारतची चाचणी देखील मंगळवारी मंगळुरू मध्य रेल्वे स्थानकावरून सुरू झाल्याचे रेल्वेद्वारे सांगण्यात आले आहे.

Pramod Yadav

Mangaluru-Madgaon Vande Bharat Express: गोव्यासाठी आणखी एका सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा केंद्राने केलीय. कर्नाटकातील मंगळुरू ते दक्षिण गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकापर्यंत ही रेल्वे धावणार आहे.

वंदे भारतची चाचणी देखील मंगळवारी मंगळुरू मध्य रेल्वे स्थानकावरून सुरू झाल्याचे रेल्वेद्वारे सांगण्यात आले आहे.

असे असेल वेळापत्रक

नवीन मंगळुरु-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी 8.30 वाजता सुटेल आणि दुपारी 1.15 वाजता मडगावला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ते मडगाव येथून दुपारी 1:45 वाजता सुटेल आणि मंगळुरूला संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचेल. ही गाडी उडुपी आणि कारवार स्थानकावर थांबेल.

30 डिसेंबरपासून या वंदे भारत एक्सप्रेसचे नियमित संचालन सुरू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी इतर राज्यांमध्ये सहा वंदे भारत ट्रेनसह या नवीन ट्रेनचे उद्घाटन करू शकतात, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

मंगळुरु-मडगाव सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रायल रनला मंगळुरू सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवण्यात आला तेव्हा दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील, स्थानिक महापौर आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT