Karnataka Lalbagh Mango Dainik Gomantak
गोवा

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

goa bicholim mango market: कर्नाटकातील बंगळुरू येथे पिकणारा ‘लालबाग’ जातीचा आंबा सध्या डिचोली बाजारपेठेत दाखल झाला

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: कर्नाटकातील बंगळुरू येथे पिकणारा ‘लालबाग’ जातीचा आंबा सध्या डिचोली बाजारपेठेत दाखल झाला असून, यंदा मोसमापूर्वीच या आंब्यांचे आगमन झाले आहे. सध्या २०० रुपये किलो असा या आंब्यांचा भाव असून, ग्राहकांकडून या आंब्यांना मागणी आहे, असे बाजारातील काही फळविक्रेत्यांनी सांगितले.

‘लालबाग’सह तोतापुरी आंबेही बाजारात दाखल झाले असून, दीडशे रुपये किलो असे या आंब्यांचे दर आहेत. दरवर्षी हिवाळा आणि उन्हाळा या दोन हंगामात ‘लालबाग’ जातीच्या आंब्यांचे पीक येते. दिवाळीनंतर हा आंबा पिकण्यास सुरवात होते.

मात्र, उन्हाळ्यात या आंब्यांना जी गोडी असते, ती गोडी हिवाळ्यात पिकणाऱ्या आंब्यांमध्ये नसते. तरीदेखील कुतूहल म्हणून ग्राहक या आंब्यांना पसंती देतात. बाजारात सध्या या आंब्यांची कमी प्रमाणात आवक झाली असून, ग्राहकांकडून मागणी आहे, असे राजू या फळविक्रेत्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी! 8.25% व्याजदराला केंद्राचा 'हिरवा कंदील'; लाखो कर्मचाऱ्यांच्या बचतीत होणार भरघोस वाढ

Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

SCROLL FOR NEXT