Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

Morjim Thar Accident: कांचोळेवाडा - मोरजी येथे भरधाव थारच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
Morjim Thar Accident
Morjim AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: कांचोळेवाडा - मोरजी येथे भरधाव थारच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी थारचालक व वाहन मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास अश्वेहून मोरजीकडे भरधाव येणाऱ्या थार वाहनाने (जीए - ०३ - एएम - ९१६१) प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर समोरून जात असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक देत पुढे उभ्या असलेल्या टाटा टेम्पोवर आदळले.

Morjim Thar Accident
Himachal Pradesh Accident: आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला! चंबात बोलेरो दरीत कोसळून 7 जणांचा जागीच मृत्यू; रात्रीच्या अंधारात नियतीचा क्रूर डाव

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार देबाशीष सामल (वय ३२, मूळ ओडिशा) आणि दुसऱ्या दुचाकीवरील गतीश सामल (वय ३५, मूळ ओडिशा) हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर थारचालक विक्रम अशोक गाबा (रा. हरियाणा) हा वाहन घटनास्थळी टाकून फरार झाला. संबंधित थार वाहन खासगी असून ते भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्याप्रकरणी वाहनमालक रोहित राठोड याच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com