Karnataka Border Area Development Authority Dainik Gomantak
गोवा

कोणी जागा देते का जागा? कर्नाटक सरकारला गोव्यात हवीय 10 हजार चौ. फूट जागा, Whatsapp वर संपर्क साधण्याचे आवाहन

Karnataka Border Area Development Authority: वास्को किंवा वेर्णा भागात कर्नाटक सरकारला दहा हजार चौरस फूट जागेची गरज आहे.

Pramod Yadav

पणजी: कर्नाटक सरकारला गोव्यात 10 हजार चौरस फूट जागेची गरज आहे. कर्नाटकला गोव्यात सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी जागा हवी असून, याबाबत त्यांनी जाहीरात प्रसिद्ध केलीय. कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने प्रसिद्ध जाहिरातीत एक Whatsapp क्रमांत देण्यात आला आहे. यावर जागा मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात केले आहे.

कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रसिद्ध जाहिरीतीनुसार, वास्को किंवा वेर्णा भागात कर्नाटक सरकारला दहा हजार चौरस फूट जागेची गरज आहे. सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी सरकारला ही जागा हवीय. इच्छुक जागा मालकांनी प्राधिकरणाऱ्या बंगळुरुतील पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जागा मालकांनी जागेची संपूर्ण माहिती, जीपीएस फोटो पाठवणे अपेक्षित आहे. जागेचा कायदेसंबधित कोणताही वाद नसावा, असेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. जागा सांस्कृतिक सभागृह बांधण्यास योग्य असावी तसेच, रस्त्यापासून उत्तम कनेक्टिव्हिटी असावी, असेही यात म्हटले आहे.

Karnataka Border Area Development Authority Advertisement

प्राधिकरणाच्या वतीने यासाठी एक Whatsapp क्रमांक सार्वजनिक केला आहे. जागा उपलब्ध असणाऱ्या मालकांनी 9449020410 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतचे जागेची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि फोटो देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सचिव प्रकाश माथिहल्ली यांच्या नावाने ही जाहीरात सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT