Kannada Medium Schools Dainik Gomantak
गोवा

Kannada Medium Schools: कानडी शाळांचा प्रश्न कर्नाटक दरबारी; मंत्री जारकीहोळी करणार मुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासोबत चर्चा

Kannada Medium Schools Goa: गोव्यातील कानडी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी आता कर्नाटक सरकार पुढाकार घेणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्यातील कानडी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी आता कर्नाटक सरकार पुढाकार घेणार आहे. त्यासाठी कर्नाटक प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. गोव्यात कानडी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याच्या वृत्तामुळे कर्नाटकमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, शिक्षणतज्ज्ञ, राजकीय नेते आणि विविध कन्नड संघटनांनी कर्नाटक सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गोव्यात वास्तव्यास असलेल्या लाखो कन्नडभाषिकांसाठी कानडी ही मातृभाषा असल्याचे सांगत कानडी माध्यमाच्या शाळांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या विषयावर मी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करणार आहे.

गोव्यात उत्तर कन्नड आणि बेळगाव परिसरातील सुमारे चार ते पाच लाख कन्नडभाषिक राहतात. त्यामुळे त्यांना मातृभाषेत शिक्षण मिळण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. कर्नाटकचे माजी प्राथमिक शिक्षणमंत्री तथा विधान परिषद सदस्य अडगूर एच. विश्वनाथ यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान, गोव्यातील कानडी माध्यमाच्या शाळांचा प्रश्न आता राज्यांच्या सीमांपलीकडे जाऊन मातृभाषेतील शिक्षणाच्या हक्काचा विषय बनला असून आहे.

निवेदन सादर; गोवा सरकारकडे मागणी

कन्नड साहित्य आणि सांस्कृतिक मंचाचे प्रमुख श्री शांतलिंग स्वामीजी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना निवेदन सादर करून हा विषय गोवा सरकारकडे अधिकृतरीत्या मांडण्याची मागणी केली आहे. या निवेदनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (एनईपी) आधार घेत गोव्यातील चार कानडी माध्यमाच्या शाळा आधीच बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आणखी १७ शाळांमध्ये कानडी विषय शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT