Mahadayi Water Dispute | Kalsa River | Mahadayi Water Dispute Tribunal Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : गोव्यासाठी धोक्याची घंटा; ‘कळसा’चे पात्र कर्नाटककडून उद्ध्वस्त

कालव्‍यात भिंतीनजीक झिरपते पाणी; गोव्‍याकडे येणारा प्रवाह पूर्णत: आटला

गोमन्तक डिजिटल टीम

विलास ओहाळ

‘रामेश्‍‍वर मंदिर ते आंब्‍याचो हरल’ या पाच किमी भागातील कळसाचे पात्र कर्नाटक जल विभागाने अक्षरश: उद्ध्वस्त केले आहे. परिणामी कणकुंबी (ता. खानापूर) गावाच्या हद्दीतून म्‍हादईकडे येणारे ‘कळसा’चे पात्र कोरडे पडले आहे. म्‍हादईप्रश्‍‍नी गोवा सरकारने यापुढेही बेफिकिरी दाखवली तर गोमंतकाच्‍या पदरी तहानलेपण निश्‍चित आहे.

प्रत्‍यक्ष स्‍थितीची पाहणी करताना ‘गोमन्‍तक’च्‍या प्रतिनिधींनी कणकुंबीत अनेक ग्रामस्‍थांशी संवाद साधला. कणकुंबी गावाला कळसा प्रकल्पाचा काहीच उपयोग नाही. या गावाच्या हद्दीत मलप्रभा नदीचाही उगम आहे. असे असले तरी गावाला पाण्यासाठी कूपनलिकांवर अवलंबून राहावे लागत आहे. कर्नाटक सरकार कधीही कळसाचे पाणी वळविण्याचे काम सुरू करू शकते, असा संशय कणकुंबीतील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

अशी आहे स्‍थिती; पाणी कोठे मुरतेय, याचा येईल अंदाज

1 ‘कळसा’च्या पात्रापर्यंत खोदलेल्या कालव्यातून कळसाचे पाणी सध्‍या प्रवाही आहे. ते पाणी खोदलेल्या कालव्यात जमत असून त्याच ठिकाणी जमिनीत मुरत आहे.

2 ‘कालव्यात अर्धवट स्थितीत असलेल्‍या स्वयंचलित लोखंडी दरवाजापर्यंत पाणी वाहून येत असल्याचे स्पष्टपणे दिसते. गोव्‍याकडे येणारे ‘कळसा’चे पात्र सुकले आहे.

3 याच दरवाजाच्या जवळ दक्षिणेच्या बाजूला केलेले काँक्रीटीकरण खचत चालले आहे. विशेष म्हणजे पावसाच्या दिवसांत या लोखंडी दरवाजावरूनही पाणी कालव्यामध्ये गेल्याचे स्पष्ट दिसते.

4 या लोखंडी दरवाजाकडे कचरा, लाकूड व इतर वस्तू अडकलेल्या आहेत. यावरून पावसात पाण्याचा प्रवाह किती गतिमान असेल याचा अंदाज यावरून काढता येतो.

कर्नाटक संवेदनशील, गोवा गाफिल

सेन्‍सरसाठी खास सिमेंटचे खांब उभे करण्‍यात आले आहेत. पाण्‍यासाठी कर्नाटक उपरोक्‍त विषयाकडे किती संवेदनशीलपणे पाहत आहे हे दिसून येते. दुसरीकडे गोवा सरकारने गाफिलपणाचा कळस गाठला आहे.

जनाधारासाठी प्रयत्न

‘केंद्रीय जल आयोगाने सुधारित आराखड्याला परवानगी दिली आहे. तसेच मे महिन्‍यात कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. तेथे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे जनाधार मिळवण्‍यासाठी आवश्‍‍यक परवानग्या न घेताही कर्नाटक सरकार बेकायदेशीर काम पुढे रेटू शकते, असा कयास माऊली देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT