Coastal Tourism Dainik Gomantak
गोवा

Tourism: पर्यटनवृद्धीसाठी कर्नाटकची गोव्याशी स्पर्धा, किनारी भागात शॅक्स परवाने देण्याचा विचार, मंगळुरूत झाली बैठक

Goa Model Excise Policy Karnataka: कर्नाटक सरकारने किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अबकारी धोरणात सवलती देण्याचा तसेच नियंत्रित स्वरूपात शॅक्स घालण्यासाठी परवाने देण्याच्या प्रस्तावाचा विचार सुरू केल्याची माहिती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्नाटक सरकारने किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अबकारी धोरणात सवलती देण्याचा तसेच नियंत्रित स्वरूपात शॅक्स घालण्यासाठी परवाने देण्याच्या प्रस्तावाचा विचार सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मंगळूर येथे अलीकडे पार पडलेल्या एका परिषदेत किनारी भागातील हॉटेल मालक, रिसॉर्ट चालक आणि पर्यटन व्यवसायिकांनी सरकारकडे अशा प्रकारची शिफारस केली आहे.

परिषदेत हजर असलेल्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील खुले आणि पर्यटकांना आकर्षित करणारे धोरण तिथल्या पर्यटन व्यवसायास चालना देतात. “गोव्यात दारू स्वस्त असून, ती २४ तास सहज उपलब्ध असते.

त्याचप्रमाणे, गोव्यात अधिकृतपणे किनाऱ्यावर शॅक्स घालण्यासाठी परवाने दिले जातात. कर्नाटकातही जर हे धोरण अंगीकारले गेले, तर मंगळूर, उडुपी, होन्नावर, कुमठा, तडदी, कारवारसारख्या किनारी शहरांतील पर्यटनात लक्षणीय वाढ होईल, असे मत या परिषदेत प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

या सुचनेचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अटळतेने मान्य केले. अबकारी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘राज्याच्या उत्पन्नात वाढ करणे हा देखील यामागील उद्देश असून, गोव्यासारखी धोरणे कर्नाटकात लागू करणे शक्य आहे की नाही, याचा सर्वसमावेशक अभ्यास केला जात आहे.’

गोवा मॉडेल’वर अभ्यास सुरू

दरम्यान, या प्रस्तावावर विरोधाचे सूरही उमटू लागले आहेत. कर्नाटकातील काही सामाजिक संस्था, महिला संघटना आणि धार्मिक नेत्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, अशा धोरणांमुळे सामाजिक अधःपतन होण्याची शक्यता असून, राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर परिणाम होईल.

सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसला तरी, पर्यटन वाढवण्यासाठी ‘गोवा मॉडेल’चा अभ्यास सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या विधानसभा अधिवेशनात यावर अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT