Anil Benke Meets Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Fines: गोव्यातील वाहतूक 'तालांव'वर कर्नाटक भाजपची नाराजी; ई-चलन प्रणालीचा फेरआढावा घेण्याची बेनके यांची मागणी

Anil Benke Meets Pramod Sawant: गोव्यातील वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा आणि ई-चलन प्रणालीचा फेरआढावा घेण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्यात पर्यटक आणि सीमावर्ती भागातून येणाऱ्या वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या वाहतूक (तालांव) दंडाच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत कर्नाटक भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गोव्यातील वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा आणि ई-चलन प्रणालीचा फेरआढावा घेण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.

बेनके यांनी विशेषतः बेळगावसह कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या वाहनचालकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. अनेक वाहनधारकांना चुकीची ई-चलन मिळत असल्याच्या तक्रारी, अपुरे किंवा अस्पष्ट वाहतूक फलक, किरकोळ उल्लंघनांसाठी आकारले जाणारे मोठे दंड आणि त्याचा पर्यटन उद्योगावर होणारा विपरीत परिणाम यासंदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली.

त्यांच्या मते, वाहतूक नियमांचे पालन आवश्यक असले तरी दंडात्मक कारवाई करताना न्याय्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. विशेषतः प्रथमच किरकोळ चूक करणाऱ्या वाहनचालकांना तत्काळ दंड ठोठावण्याऐवजी इशारा देण्याची व्यवस्था सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे पर्यटकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल आणि गोव्याची पर्यटकस्नेही प्रतिमा अधिक बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले.

मुद्यांचा अभ्यास होईल!

बेनके यांनी असेही म्हटले की, राज्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक नियमांची स्पष्ट माहिती मिळावी यासाठी सीमावर्ती भागात आणि प्रमुख मार्गांवर अधिक प्रभावी सूचना फलक उभारण्याची गरज आहे. तसेच चुकीच्या ई-चलनांबाबत तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवेदन स्वीकारून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचा अभ्यास केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT