Kargil Victory Day Dainik Gomantak
गोवा

Kargil Vijay Diwas: ''भारतीय जवानांनी शत्रुवर नेहमीच विजय मिळवला''

कारगिल विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असायला हवा

दैनिक गोमन्तक

वास्को: भारतीय जवानांनी नेहमीच शत्रुवर विजय मिळवलेला असून याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असायलाच हवा असे प्रतिपादन नगराध्यक्ष लिओ रॉड्रिगीस याने केले. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने जेटी सडा येथील श्री सुसेनाश्रम विद्यालयांमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ वास्को तर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

(Kargil Victory Day at Vasco was celebrated with enthusiasm )

यावेळी व्यासपीठावर जेन्ट्स ग्रुप ऑफ वास्कोचे अध्यक्ष तथा नगरसेवक दामोदर नाईक परशुराम, नंदकिशोर शेटे आनंद सातार्डेकर, शुभम यादव, गायत्री कुबल, अनुपमा गावस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणामध्ये नगराध्यक्ष म्हणाले, की 23 वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी अनपेक्षितपणे भारतीय सीमेच्या आत घुसखोरी करून तेथील प्रांत आपल्या ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र सदैव तत्पर असलेल्या भारतीय जवानांनी सुमारे दोन महिने यशस्वीरित्या प्रत्युत्तर देत त्यांना भारतीय सीमेतून हाकलून लावण्यात यश मिळवले.

भारतीय सैनिकांनी नेहमीच दुश्मनाने केलेले हल्ले यशस्वीरित्या परतावून लावले आहेत. भारतीयांसाठी ही जमेची बाजू आहे. याचा आपल्या सर्वांना अभिमान सर्वांना वाटायला पाहिजे. आपल्या देशाचा इतिहास पाहूनच विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन नगराध्यक्ष यांनी यावेळी केले.

जॉइंट्स ग्रुपचे अध्यक्ष दामोदर नाईक यांनी कारगिल युद्धातील काही महत्त्वाच्या घटना आपल्या भाषणातून नमूद केल्या. विद्या सातार्डेकर यांचेही यावेळी भाषण झाले. कारगिल विजय दिवस विषयावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.

वरिष्ठ गटातून ऋतुराज तलावडेकर - प्रथम, प्रज्ञेश वराडकर - द्वितीय व रंजीता पाल - तृतीय तसेच कनिष्ठ गटातून दिपाशा शेटे प्रथम- भाग्यश्री हिरेकुरबर - द्वितीय व क्षितिज रेडकर - तृतीय यांना बक्षीसे देण्यात आली .शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संगीता कुंभार यांनी केले तर शिक्षक संतोष खोर्जुवेकर यांनी आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT