Kargil Victory Day Dainik Gomantak
गोवा

Kargil Victory Day: वास्कोमध्ये हुतात्म्यांना आदरांजली अर्पण

आमदार कृष्णा साळकर यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोमध्ये नागरिकांतर्फे हुतात्मा चौकात हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी शहिदांना आदरांजली वाहताना शहिदांसह जवानांची देशासाठी केलेला त्याग आणि समर्पन देशातील नागरिक कायम लक्षात ठेवतील असे गौरवउद्गगार काढले. (Kargil Victory Day: Tribute to Martyrs at Vasco )

हा कार्यक्रम वास्को येथील सेंट अँड्र्यूज चर्च स्क्वेअर येथील हुतात्मा चौकात शूर सैनिकांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि वास्कोतील नागरिकांनी कारगिल विजय दिवस साजरा केला. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, युनायटेड वेटरन्स गोवाचे सदस्य, तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मेणबत्ती लावून आणि मौन अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

''भारतीय जवानांनी शत्रुवर नेहमीच विजय मिळवला''

भारतीय जवानांनी नेहमीच शत्रुवर विजय मिळवलेला असून याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असायलाच हवा असे प्रतिपादन नगराध्यक्ष लिओ रॉड्रिगीस याने केले. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने जेटी सडा येथील श्री सुसेनाश्रम विद्यालयांमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ वास्को तर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर जेन्ट्स ग्रुप ऑफ वास्कोचे अध्यक्ष तथा नगरसेवक दामोदर नाईक परशुराम, नंदकिशोर शेटे आनंद सातार्डेकर, शुभम यादव, गायत्री कुबल, अनुपमा गावस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT