माजाळी तपासणी नाक्यावर 90 हजारांचे स्पिरिट जप्त

कर्नाटक अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई
Spirit
SpiritDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: कर्नाटकातील अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी माजाळी तपासणी नाक्यावर अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेले स्पिरिट जप्त केल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईबरोबरच अधिकाऱ्यांनी बेकायदा दारू ही वाहनासह ताब्यात घेतली आहे. (Spirit worth 90 thousand seized at Majali check post Karnataka )

Spirit
मंकीपॉक्सच्या धास्तीने गोवा सरकार सतर्क

सोमवारी रात्री टी एन बी -झेड 2794 या मालवाहू ट्रकमधून या मालाची वाहतूक करण्यात येत होती. वाहनाच्या हौद्यात दर्शनी भागात हार्पिकचे रिकामे खोके आणि मागच्या बाजूला स्पिरीटचे कॅन ठेवले होते. या अवैध वाहतुकीसंबंधी कर्नाटकातील अबकारी खात्याला खबऱ्याने माहिती दिल्याप्रमाणे पोळे तपासणी नाका ओलांडून ते वाहन माजाळी तपासणी नाक्यावर पोचल्यानंतर अबकारी अधिकाऱ्यांनी वाहन अडवून तपासणी केली.

यावेळी तपासणी करताना सुमारे 90 हजार 300 रुपयांचे स्पिरिट, सुमारे 8 लाख रुपये किंमतीचे इतर साहित्य सापडले. अबकारी खात्याने वाहनासह सुमारे 24 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली. त्याचप्रमाणे काल अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी कार दारूसह ताब्यात घेतली.

Spirit
Jet Patcher: दक्षिण गोव्यात आणखी दोन 'जेट पॅचर' मशीन

अन् काणकोण अधिकाऱ्यांचा भ्रमनिरास

आज अशाच प्रकारे एक ट्रक गोव्यातून स्पिरीट घेऊन कर्नाटकात जाणार असल्याची माहिती काणकोण अबकारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोळे तपासणी नाक्यावर अबकारी अधिकाऱ्यांनी पाळत ठेवून ट्रक (केएल - एस.8182) अडवून त्यातील सर्व मालाची तपासणी केली. मात्र, काही दारूची प्रिंटेड लेबल्स वगळता काहीच संशयास्पद सापडले नाही, असे अबकारी खात्याचे अधीक्षक चंद्रशेखर देसाई आणि अबकारी निरीक्षक अंकुश काणकोणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com