Waste Management  Dainik Gomantak
गोवा

Karapur Sarvona: पंचायतीची कचरावाहू वाहने गायब, पावसाने जाळीचे नुकसान; 'कारापूर-सर्वण'मधील कचरा समस्या जैसे थे

Karapur Sarvona Panchayat: दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री सावंत हे इमारतीच्या उद्‍घाटन सोहळ्यानिमित्त कारापूर येथे आले होते. त्यावेळी कचऱ्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी पंचायतीला फैलावर घेतले होते.

Sameer Panditrao

डिचोली: कचऱ्याची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी कारापूर-सर्वण पंचायतीने महत्त्वाच्या ठिकाणी लावलेली ''जाळी'' पावसाच्या तडाख्यात बाराच्या भावात गेली आहे.

दरम्यान, पंचायतीला दिलेली कचरावाहू वाहने अद्याप बेपत्ता असल्याने पंचायत क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या आठवड्यापासून कहर केलेल्या पावसामुळे ''ब्लॅकस्पॉट'' ठिकाणी लावलेली जाळी मातीमोल झाली असून पंचायतीने केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्यातच जमा झाला आहे.

दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पंचायत इमारतीच्या उद्‍घाटन सोहळ्यानिमित्त कारापूर येथे आले होते. त्यावेळी कचऱ्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी पंचायतीला फैलावर घेतले होते. त्यानंतर पंचायतीने लागलीच स्वच्छता मोहीम हाती घेताना परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती.

रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचे प्रमाण नियंत्रणात यावे. यासाठी कारापूर-सर्वण पंचायतीने ब्लॅकस्पॉट बनलेल्या मुख्य रस्त्यासह विविध भागात ''जाळी'' बसवली आहे. मात्र हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. काही ठिकाणी ‘जाळी’ उभारूनही त्या ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहे. गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या अवकाळी पावसाने ठिकठिकाणी उभारलेली ‘जाळी’ जमीनदोस्त केली आहे.

ती वाहने महिला पंचाच्या ताब्यात

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील कचरा गोळा करण्यासाठी सरकारतर्फे दोन महिन्यापूर्वी पंचायतीला दोन कचरावाहू वाहने दिली आहेत, मात्र ही वाहने अद्याप कचरा गोळा करण्यासाठी रस्त्यावर उतरली नाहीत की वाहनांचे अनेकांना अद्यापही दर्शन झालेले नाही. ही कचरावाहू वाहने नेमकी कोठे आहेत, ते कळणे मुश्कील असले, तरी ही वाहने अलीकडेच सरपंचपदाचा राजीनामा दिलेल्या एका महिला पंचसदस्यांच्या ताब्यात असल्याचे समजते. एका ज्येष्ठ पंचसदस्याने या माहितीस दुजोरा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT