One Goa Mega Residential Project Dainik Gomantak
गोवा

One Goa Mega Residential Project: 161 दिवसांचे आंदोलन, आता ग्रामसभेत संघर्षाची शक्यता; 'वन गोवा' प्रकल्पाचा मुद्दा तापणार

Gram Sabha Meeting: कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा रविवारी होणार असून, वादग्रस्त ‘वन गोवा’ मेगा निवासी प्रकल्पाच्या मुद्यावरून ग्रामसभा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा रविवारी (ता. १) होणार असून, वादग्रस्त ‘वन गोवा’ मेगा निवासी प्रकल्पाच्या मुद्यावरून ग्रामसभा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. प्रकल्पाविरोधात पंचायतीने बजावलेली काम बंद नोटीस पंचायत संचालकांनी रद्द केल्याने कारापूर गावात पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे.

पंचायत संचालकांच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान द्यावे, असा ठराव ग्रामसभेत मांडण्याची तयारी प्रकल्पविरोधी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकल्पाविरोधात तब्बल १६१ दिवस आंदोलन केलेल्या ग्रामस्थांनी निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सरपंच योगेश पेडणेकर यांचीही सत्त्वपरीक्षा होणार आहे. संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन पंचायतीने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

कारापूर येथील ‘वन गोवा’ प्रकल्पाला सुरवातीपासूनच स्थानिकांचा विरोध आहे. प्रकल्पाचे काम बंद करावे, या मागणीसाठी महिलांसह ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले होते. तत्कालीन सरपंच अवनी (बिंदिया) सावंत यांच्या कार्यकाळात गेल्या सप्टेंबरमध्ये पंचायतीने संबंधित प्रकल्पाला काम बंद नोटीस बजावली. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी १६१ दिवसांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, प्रकल्प कंपनीने पंचायतीच्या नोटिसीला आव्हान दिल्यानंतर पंचायत संचालकांनी ती रद्द केली. त्यामुळे प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून पेन्शनधारकांना मोठी अपेक्षा! किमान 45,000 पेन्शन देण्याची मागणी, फॅमिली पेन्शनमध्येही 50 टक्के वाढीचा प्रस्ताव

Sai Baba Temple Takeover Case: बोरी साईबाबा मंदिर ताबा प्रकरणात नऊ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले; बनावट कागदपत्रांवर न्यायालयाचे ताशेरे

'गोवा मुक्ती'ला विलंब नेहरूंमुळेच- मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

Dhangar ST Status Demand: 23 वर्षांची प्रतीक्षा, आता धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 'एसटी' दर्जा न मिळाल्यास 4-5 आमदारांना पाडण्याचा दावा

Goa Politics: काँग्रेसला 'हात' की वेगळी चूल? निवडणुकीबाबत 'आरजी'च्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक

SCROLL FOR NEXT