Karapur Sarvan Dainik Gomantak
गोवा

Karapur Sarvan: दुर्गंधीयुक्त कचऱ्यात गुदमरतोय सर्वण-कारापूरवासीयांचा श्‍‍वास!

Karapur Sarvan Garbage Issue: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात पुन्हा एकदा कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, ता. ६ (प्रतिनिधी) : कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात पुन्हा एकदा कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. सर्वण गावात तर रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, पावसामुळे तो कुजून दुर्गंधी पसरली आहे.

विशेष म्हणजे पंचायतीतर्फे घरोघरी कचऱ्याची उचल होत असली तरी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. उघड्यावर आणि रस्त्याच्या बाजूने कचरा टाकणाऱ्यांविरोधात पंचायतीने दंडात्मक कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.

कारापूर-तिस्क, कुळण, गोकुळवाडा, न्यूवाडा, सर्वण आदी भागात कचऱ्याची समस्या उग्र बनली आहे. पंचायतीतर्फे साफसफाई केली की काही दिवस परिसर स्वच्छ दिसून येतो. नंतर पुन्हा कचरा समस्या डोके वर काढते. हा कचरा कोठून येतोय आणि कोण टाकतोय. याबद्दल गूढ निर्माण होत आहे.

डिचोली-साखळी मुख्य रस्त्याला जोडून सर्वण गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूने तर कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या बाजूने पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्वण उतरणीवरील रस्त्यावर सध्या प्लास्टिक आदी कचरा साचला आहे. या कचऱ्यामध्ये गाद्याही टाकण्यात आल्याचे दिसून येते. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून कचाऱ्याची ही समस्या निर्माण झाली आहे.

परिसरात रोगराई फैलावण्‍याची भीती

पावसामुळे हा कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे रोगराई फैलावण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. भर रस्त्यावरील या कचऱ्याकडे स्थानिक पंचायतीचे लक्ष जात नसल्याबद्धल लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. सर्वण येथे रस्त्याच्या बाजूने कुजलेला दुर्गंधीयुक्त कचरा पंचायतीने हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT