Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘विठू’च्या नामघोषात ‘माघ’वारी; कारापुरात विठूचा गजर

Bicholim News : वारीत ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग, मंदिर परिसर भक्तिमय

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, कारापुरात टाळ-मृदंुगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विठ्ठलभक्त वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.

कारापूर येथील श्री शांतादुर्गा ज्ञानेश्वर वारकरी मंडळाच्या माघ पायीवारीला आजपासून (बुधवारी) उत्साही आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.

या वारकरी मंडळाचे माघ एकादशी पायवारीचे यंदाचे दुसरे वर्ष असून, महिला आणि ज्येष्ठ वारकरी मिळून यंदा चाळीस विठ्ठलभक्त या पायीवारीत सहभागी झाले आहेत. यात ७० वर्षे वय पूर्ण केलेल्या वारकऱ्यांचाही समावेश आहे.

बुधवारी सकाळी विठ्ठलभक्त वारकऱ्यांनी कारापूरचे आराध्य दैवत श्री शांतादुर्गा देवीसह अन्य देवदेवतांचे आशीर्वाद घेतले.

नंतर वारकऱ्यांनी पंढरीला जाण्यासाठी वाट धरली. वारकरी मार्गस्थ झाले त्यावेळी विठ्ठल नामाचा एकच जयघोष सुरू झाला.

श्रीरामांचा जयघोषही कानावर पडत होता. मंदिर परिसरात मंगलमय आणि भक्तिमय वातावरण पसरले होते. वारकऱ्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे नातलग आणि शुभचिंतकही आले होते. कारापूर-सर्वणमार्गे दोडामार्गहून हे वारकरी पंढरपुरला जाणार आहेत.

तेरा दिवस पायी प्रवास

कारापूरहून पंढरपूरला मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांमध्ये ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. दुपारी आणि रात्री ठराविक ठिकाणी विश्रांती घेऊन सलग तेरा दिवस हे वारकरी पायी चालत प्रवास करणार आहेत.

१९ फेब्रुवारी रोजी हे वारकरी पंढरपूरला चंद्रभागेच्या तिरी पोचणार आहेत. २० रोजी माघ एकादशी यात्रेत हे वारकरी सहभागी होणार आहेत. पंढरीच्या श्री विठूमाऊलीचे दर्शन घेऊन हे वारकरी माघारी परतणार आहेत.

मला श्री विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. कधी एकदा पंढरपूर गाठून विठूरायाचे दर्शन मिळते याची ओढ लागली आहे, असे वयोवृद्ध वारकरी शाणी नार्वेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT