कराची या शहराचा गोव्यातील सॉरपोटेल किंवा बेबिंका यासारख्या पदार्थाशी संबंध जोडता येणार नाही. पण जर तुम्ही अमचेम गोवा (Goa) या पाकिस्तानी (Pakistan) शहरातील एकमेव गोव्यातील रेस्टॉरंटविषयी एकले नसेल, जे फर्नांडिस कुटुंबातील सदस्यांकडून चालवले जाते.
हे दुकान गेल्या ऑक्टोबरमध्ये उघडलेले आहे. हे दुकान गोव्यातील मोठ्या समुदायला सेवा पुरावते. ज्यांचे काही सदस्य शहरात तीन पिढ्यांपासून राहत आहेत. कराचीमधील एका गोवण व्यक्तीने पदार्थावर टिप्पणी केली तेव्हा कुटुंबाला गोवण पदार्थांचे दुकान उघडण्याची कल्पांना मिळाली. अवघ्या एका वर्षात, आमचेम गोवा या रेस्टॉरन्टची स्थापना केली. येथे गोवण पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही नाकी भेट देवू शकता.
या कुटूंबातील सदस्यांनी तयार केलेले पदार्थ अधिक चवदार आहेत. सॉरपोटेलमध्ये डूकराचे मास गोमासाने घेतले आहे. यात अनेक मसाल्ल्यांचा वापर केला जातो. पण यतेथे काही गोष्टी कायम आहेत. अमचेम गोवा येथे हिंग हा मसाल्याचा पदार्थां देखील वापरला जातो. हे पदार्थ पारंपारिक पद्धतीने बनवले जातात. गोव्यामधील सासष्टि या भागातून हे कुटुंब कराचीमध्ये आले. या कुटुंबाला रीटा ब्रागांझा या नामांकित शेफचा वारसा मिळाला आहे. काही कुटुंब अजूनही गोव्यात आहेत. पण फाळणीनंतर हे कुटुंब गोव्यातून कराचीमध्ये आले.
'अमचेम गोवा' (Amchem Goa) गोव्यातील खाद्यसंस्कृती जपण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यांचे ग्राहक देखील त्यांच्या पदार्थांचा अनेक लोक आस्वाद घेत आहेत. वाग्याचे लोणचे, कोळंबी बलचो आणि आंबा कोरमपासून ते डोडोल आणि बोलिन्हास, नारळाच्या मॅकरून, स्टेफनी सॉरपोटेल , क्रॅब करी,लिंबाचे लोणचे आणि बेबिका या पदार्थांच्या चवीला येथील लोकांनी पसंती दिली आहे. या कुटुंबातील काही सदस्य पदार्थ बनवतात तर काही गोड पदार्थ बनवतात आणि दागिन्यांचा साइड बिझनेस चालवतात.
अमचेम गोवा (Amchem Goa) या रेस्टॉरंटमधील पदार्थ खूप चवदार असल्याने खूप प्रसिद्धी मिळलाई आहे. अगदी कराचीमधील ब्लॉगर बिलाल हसन यानीही "अमचेम गोवा" बद्दल लिहिले आहे. त्याने लिहिले होते की आम्हाला गोव्याच्या संस्कृतीबद्दल लोकांना जाणून घ्यायला आवडेल, त्यावर या कुटुंबातील सदस्याने सांगितले की गोव्याची संस्कृती ही जीवन जगण्याची , आनंदी राहण्याची आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेणे आहे. 'अमचेम गोवा' या संस्कृतीची जोपासना करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.