Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कन्‍हैयाकुमारवर हल्ला कोणी केला? गुन्हेगार अद्याप मोकाट

Kanhaiya Kumar Mondal Death: कन्‍हैयाकुमार मृत्‍यूप्रकरणी कर्नाटकमधून चालक अटकेत;अपघाताची कबुली

गोमन्तक डिजिटल टीम

कन्‍हैयाकुमार मंडल या बिहारी इसमाच्‍या मृत्‍युप्रक़रणी मायणा-कुडतरी पोलिसांनी वासू कांबळी मदार याला बुधवारी अटक केली असली तरी आतापर्यंत त्‍याने आपल्‍या हातून केवळ अपघात घडल्‍याचीच कबुली दिली आहे. मात्र, कन्‍हैयाकुमारला धारदार शस्‍त्राने कुणी भाेसकले, याची माहिती अद्याप पाेलिसांना मिळालेली नाही.

२४ जून राेजी रात्री कन्‍हैयाकुमारचा मृत्‍यू झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पाेलिसांनी या प्रक़रणात ‘हिट ॲण्ड रन’ची केस नाेंदविली होती. मात्र, त्याच्‍या अंगावर धारदार शस्‍त्राने केलेल्‍या दहा जखमा आढळल्‍याने हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्‍याचे उघड झाले होते. त्‍यानंतर याप्रक़रणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता.

मायणा-कुडतरी पाेलिसांनी या प्रकरणात कर्नाटकमधून संशयित वासू मदार याला अटक केली होती. मदार याच्याकडून आतापर्यंत पोलिसांना जी माहिती प्राप्‍त झाली, त्‍यानुसार २४ जूनच्‍या रात्री मदार हा ट्रक घेऊन कर्नाटककडे जात असताना लाेटली मिसिंग लिंक रस्‍त्‍यावर त्‍याची गाडी कुठल्‍या तरी वस्‍तूवरून गेल्‍याचे त्‍याच्या लक्षात आले.

त्‍यामुळे त्‍याने कच्‌कन ब्रेक लावला. मात्र, त्‍याला पुढे काहीच न दिसल्‍याने तो ट्रक घेऊन निघून गेला. यापूर्वी ‘गोमन्‍तक’नेही त्‍या ठिकाणी असेच काहीतरी घडले असावे, अशाप्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले होते. ज्‍या रस्‍त्‍यावर या ट्रकचा ब्रेक लागला, त्‍या ब्रेकचे ठसे उमटलेले छायाचित्रही ‘गाेमन्‍तक’ने प्रसिद्ध केले होते.

९ ते २५ जूनपर्यंतचे सीसीटीव्‍ही फुटेज गायब

ज्‍या दिवशी कन्‍हैयाकुमारचा मृत्‍यू झाला, त्‍या रात्री फोंडा पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले आणि लाेटली जंक्‍शनवर आणून सोडले होते, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

परंतु त्‍याला फाेंडा पाेलिस स्‍थानकावर आणल्‍यानंतर त्‍याला लाेटलीपर्यंत आणून साेडेपर्यंत मधल्या काळात काय काय झाले, याचा तपशील मिळविण्‍यासाठी मायणा-कुडतरी पोलिसांनी फोंडा पाेलिसांकडून पाेलिस स्‍टेशनमधील सीसीटीव्‍ही फुटेज मागितले होते.

मात्र, ९ ते २५ जूनपर्यंतचे फुटेज फाेंडा पाेलिसांकडे उपलब्‍ध नसल्‍याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याला लिहिलेल्‍या पत्रात खुद्द फाेंडा पोलिसांनीच ही माहिती उघड केली आहे.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

कन्‍हैयाकुमारच्‍या अंगावरून जी गाडी गेली, ते वाहन म्‍हणजे, वासू मदार चालवित असलेला ट्रक हे आता उघड झाले आहे. मात्र, कन्‍हैयाकुमारचा मृत्‍यू अपघाताने नव्‍हे, तर त्‍यापूर्वी केलेल्‍या धारदार शस्‍त्राच्‍या वारामुळे झाल्‍याचे शवचिकित्‍सा तपासणीत स्‍पष्‍ट झाले होते.

त्‍यामुळे कन्‍हैयाकुमारवर हे वार कुणी केले आणि त्‍यात किती व्‍यक्‍ती सामील आहेत, हे शोधून काढण्‍याचे मोठे आव्‍हान पोलिसांसमोर आहे. त्‍यांनी आपल्‍या परीने तपास सुरू केला असला तरी अजून म्‍हणावे तसे यश त्‍यांच्‍या पदरात पडलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी; चिंबलवासीयांचा विरोधच

Goa Jail: कैद्यांच्या जेवणावर होणार 90 ऐवजी 123 रुपये खर्च! दरवाढ लागू; पोषणमान, महागाईचा विचार करून निर्णय

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

Ponda: रितेश नाईकांच्या गळ्यात माळ पडणार का? फोंड्याचा आमदार बिनविरोध निवडण्याची मागणी; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे मौन

Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

SCROLL FOR NEXT