Ponda Death Case: फोंडा पाेलिसांना सांभाळून घेण्‍याचा प्रयत्‍न?

Kanhaiya Kumar Mandal: कन्‍हैयाकुमारचा मृत्यू अपघातानेच; तपास यंत्रणेचा ठाम दावा
Kanhaiya Kumar Mandal:  कन्‍हैयाकुमारचा मृत्यू अपघातानेच; तपास यंत्रणेचा ठाम दावा
PoliceCanava
Published on
Updated on

कन्‍हैयाकुमार याच्‍या गळ्‍यावर आणि पोटावर तीक्ष्‍ण हत्‍यारांनी केलेले वार सापडूनही मायणा-कुडतरी पाेलिस हा घातपाताचा प्रकार नव्‍हे, तर केवळ अपघाती मृत्‍यू याच मुद्यावर अडकून पडले आहेत. त्‍यामुळे कुणाला वाचविण्‍यासाठी तर ते तसे करत नाहीत ना, असा संशय निर्माण झाला आहे.

कन्‍हैयाकुमारला रात्रीच्‍यावेळी लोटली येथील त्‍या निर्मनुष्‍य रस्‍त्‍यावर फोंडा पोलिसांच्‍या रॉबर्ट व्‍हॅनने आणून सोडले होते. फोंडा पोलिसांना सांभाळून घेण्‍यासाठी तर मायणा-कुडतरी पोलिस या गुन्‍ह्यावर पांघरूण घालण्‍याचा प्रयत्‍न तर केला नाही ना, असा संशय आता घेतला जात आहे.

पोलिसानेच केला भांडाफोड

घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हा इसम मृत पावल्‍याचे पोलिसांच्या लक्षात आल्‍यावर कन्‍हैयाकुमारच्‍या घरच्‍यांनी ताे बेपत्ता आहे, अशी पोलिस स्‍थानकावर तक्रार देऊ नये यासाठीही प्रयत्‍न करण्‍यात आले होते.

मात्र, एका पोलिसाने कन्‍हैयाकुमारच्‍या कुटुंबीयांना फोंडा पोलिसांनी आदल्‍या रात्री त्‍याला ताब्‍यात घेतले होते, अशी माहिती गुप्‍तपणे दिल्‍याने या पोलिसांनी गूढ ठरविलेल्‍या मृत्‍यूला वाचा फुटली.

कुटुंबीयांनी मृताची ओळख पटविली आणि त्‍यानंतर एक एक मुद्दा पुढे येऊ लागला. मात्र, अजूनही मायणा-कुडतरी पोलिस नेमके कुणाला तरी वाचवू पाहतात, याचे कोडे उलगडलेले नाही.

Kanhaiya Kumar Mandal:  कन्‍हैयाकुमारचा मृत्यू अपघातानेच; तपास यंत्रणेचा ठाम दावा
Ponda News: फोंड्यात रस्त्यांचे वाजले तीन-तेरा; सतत खोदकाम

‘त्या’ प्रकरणाची पोलिस डायरीत नोंदच नाही

या प्रक़रणात चाैकशी केली असता जी माहिती प्राप्‍त झाली आहे, त्‍यानुसार २५ जून रोजी हा कन्‍हैयाकुमार फाेंडा येथे रस्‍त्‍यावर धिंगाणा घालून वाहने अडवितो, अशी तक्रार फोंडा पोलिसांकडे आल्‍यानंतर त्‍याजागी रॉबर्ट व्‍हॅन पाठविली गेली आणि त्‍याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. मात्र, यासंबंधी पाेलिस डायरीवर जी नाेंद करणे आवश्‍‍यक हाेती, ती नोंदच केली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com