Mayem Kalutsav  Dainik Gomantak
गोवा

मयेत कळसोत्सव सुरू

कडक बंदोबस्‍त: भाविकांची गर्दी; आजपासून घरोघरी आगमन

दैनिक गोमन्तक

डिचोली: समस्त भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील श्री महामाया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला आज सोमवार दि. 7 मार्चपासू्न प्रारंभ झाला. शेकडो भक्तगणांच्या उपस्‍थितीत आणि कडक पोलिस बंदोबस्तात गावकरवाडा-मये येथील श्री महामाया मंदिरातून सायंकाळी कळस बाहेर काढण्यात आला. उद्यापासून आठ दिवस भक्तांच्या भेटीसाठी कळसाचे घरोघरी आगमन होणार आहे. दरम्‍यान, पुढच्‍या मंगळवारी म्‍हणजे दि. 15 मार्च रोजी सायंकाळी कळसाचे पुन्‍हा श्री महामाया मंदिरात आगमन होणार आहे. त्याठिकाणी कौलोत्सव होऊन उत्सवाची सांगता होईल.

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरुन गेल्या काही वर्षांपासून वादात अडकलेला मयेचा कळसोत्सव यंदा निर्विघ्नपणे साजरा होणार की नाही, त्याकडे तमाम भक्तगणांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कळस मंदिरातून बाहेर काढण्यात आला.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी यंदाही मंदिरातून कळस बाहेर काढताना मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

उत्‍सवाला वादाची पार्श्वभूमी

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरून मयेतील कळसोत्सव गेल्या काही वर्षांपासून वादात अडकला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून 2019 साली कळसोत्सवासह माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव देवालय प्रशासकाकडून रद्द करण्यात आले होते. 2020 सालीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शेवटच्या क्षणी कळसोत्सव रद्द करण्यात आला होता. मात्र नंतर उच्च न्यायालयाने परब समाजाला कळसोत्सव साजरा करण्याची मोकळीक दिल्यानंतर पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला होता. गेल्यावर्षी मात्र किरकोळ अपवाद वगळता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा करण्यात आला.

भाविकांचा उत्साह शिगेला

श्री महामाया देवीच्या मंदिरात देवीचा कळस अबोलीच्या फुलांनी सजविण्यात आला होता. सायंकाळी कळस मंदिराबाहेर काढून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोडाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. पारंपरिक गाऱ्हाणे घातल्यानंतर अवसारी मोडासह वाजतगाजत देवीच्या कळसाचे श्री केळबाय मंदिरात प्रस्थान झाले. त्याठिकाणी पूजाअर्चा आदी पारंपरिक विधी पार पडल्यानंतर कळसाचे श्री सातेरी मंदिरात आगमन झाले. उद्यापासून (मंगळवारी) घरोघरी कलश फिरल्यानंतर पुढच्‍या मंगळवारी (ता. 15) कलशाचे श्री महामाया मंदिरात आगमन होऊन कौलोत्सवाने या उत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT