तृणमूल काँग्रेस गोव्यात पंचायत निवडणुकाही लढणार : लुईझिन फालेरो

गोव्यात विधानसभा निवडणुकीत काय होणार सांगणं कठीण असल्याचंही मत
TMC MP Luizinho Falerio
TMC MP Luizinho FalerioDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीत काय होणार हे सांगणं कठीण आहे. कुणीही त्याचा अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे आपण निकालाची वाट पाहणंच योग्य आहे, असं तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरा यांनी म्हटलं आहे. तसंच गोव्यात होऊ घातलेल्या आगामी पंचायत निवडणुकीतही तृणमूल काँग्रेस सर्व ताकदीनिशी लढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. (Luizinho Falerio News Updates)

TMC MP Luizinho Falerio
मडगाव-नुवे पश्‍चिम बगलमार्ग काम पोलिस संरक्षणात पूर्ण करा

गोव्यात गेल्या 3 महिन्यात तृणमूल काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे आम्हाला या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) जनादेश मिळेल. तसंच लोक आमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गोव्याचं राजकारण वेगळं आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल हे सांगणं खऱोखरच कठीण आहे. आपण निकालाही वाट पाहणं योग्य असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच पंचायत निवडणुकीत तृणमूल (TMC) उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

TMC MP Luizinho Falerio
बीचवरील कर्कश्श आवाजाचा त्रास, शिवोलीत विद्यार्थ्यांची तक्रार

आगामी पंचायत निवडणुकीतही रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. कारण याआधीच रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांनी पंचायत निवडणुकीत आपण लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे विधानसभेसारखीच पंचायत निवडणुकीतही आता चुरस वाढणार आहे. आम आदमी पार्टीही येत्या पंचायत निवडणुकीत लढण्याची शक्यता आहे. दरम्यान लुईझिन फालेरो यांनी या विधानसभेत त्रिशंकू स्थिती आल्यास कुणाला पाठिंबा देणार याबाबत भाष्य केलेलं नाही. मात्र तृणमूलसोबत आघाडी केलेल्या मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकरांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. याकडे तृणमूल कसं पाहतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com