Kala Rakhonn Mand, Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: 70 कोटी खर्च तरी 'कला अकादमी'बाबत तक्रारी, मुख्यमंत्र्यांना नाही वेळ; कलाराखण छेडणार ‘सुपारी’आंदोलन

Kala Rakhonn Mand: अकादमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी वारंवार करूनही ती नाकारली जात असल्याची टीका प्रभूदेसाई यांनी केली.

Sameer Panditrao

पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरणात आढळलेल्या दोषांचे निरीक्षण करण्यासाठी स्वतः नेमलेल्या कृती दलाला (टास्क फोर्स) बैठकीसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत वेळ देत नाहीत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी आंदोलन करण्यात येणार होते, परंतु तियात्र दिन पुढे ढकलण्यात आल्याने हे आंदोलनही पुढे ढकलण्यात आले असून, येत्या काही दिवसांत ते ‘सुपारी’ आंदोलन म्हणून छेडले जाईल, अशी घोषणा कला राखण मांडच्या सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

कला अकादमीच्या प्रवेशद्वाराबाहेर झालेल्या या पत्रकार परिषदेस कला राखण मांडचे समन्वयक देविदास आमोणकर, सचिव सिसील रॉड्रिग्स, सदस्य फ्रान्सिस कुएल्हो, संदेश प्रभुदेसाई व ज्ञानेश मोघे यांची उपस्थिती होती.

आमोणकर म्हणाले, कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामासाठी ७० कोटी रुपये खर्च झाले, अकादमीच्या झालेल्या कामांविषयी तक्रारी येऊ लागल्या त्यावेळी ‘कला राखण मांड''ची स्थापना झाली. कला अकादमीच्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या आम्ही जनतेसमोर व सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आमचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. कला राखण मांडने आंदोलन केल्यानंतर त्याविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाचीस्थापना झाली.

कलाकारांचा अपमान

मंत्री गावडे यांनी केलेले वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. शरद पोंक्षे यांना सुपारीबाज म्हणून केलेला अपमान हा राज्यातील कलाकार, प्रेक्षकांचा व पत्रकारांचा आहे. सहा महिन्यात कृती दलाला कला अकादमी, सार्वजनिक बांधकाम खाते, कला व संस्कृती खात्याकडून व इतर संबंधित खात्याकडून मिळत नाही. सल्लागारांना बाहेरच्याबाहेर बोलाविले जाते. विशेष बाब अकादमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी वारंवार करूनही ती नाकारली जात असल्याची टीका प्रभूदेसाई यांनी केली.

कलाकारांची बोळवण

१ नूतनीकरणाच्या कामासाठी जे ७० कोटी खर्च केले ते पहाता अकादमी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला हवी होती, असे सांगत आमोणकर म्हणाले, सरकारने कृती दलाची स्थापना करून कलाकारांची बोळवण केल्याचे दिसते.

२ कारण सहा महिने झाले तरी मुख्यमंत्री बैठकीसाठी वेळ देत नाहीत. आम्ही कृती दलाच्या माध्यमातून १६ मागण्या केल्या होत्या. अकादमीतील ज्या चुका दिसून आल्या आहेत, त्या कंत्राटदारांकडून दुरुस्त करून घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे.

३ अजूनपर्यंत आम्ही उग्र आंदोलन केलेले नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. कृती दलाचे अध्यक्षही त्रासले आहेत. कृती दलाच्या झालेल्या एका बैठकीत सर्व कंत्राटदारांना बोलविले होते, परंतु एकच कंत्राटदार आले होते.

४ आमोणकर म्हणाले, पोंक्षे यांचा अपमान झाल्यानंतर सर्व काही ठीक असल्याचे सांगितले, पण पुन्हा भरत जाधव यांच्या नाटकावेळी वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याचे दिसून आले, त्यामुळे आम्ही या घटनेचा ‘कला राखण मांड''तर्फे निषेध करीत आहोत. दरम्यान, याप्रसंगी कुएल्हो व प्रभुदेसाई यांनी मते मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

Tallest Ram statue in Goa India: गोव्यात उभारला जातोय देशातील सर्वात उंच श्रीरामाचा पुतळा; 28 नोव्हेंबरला PM मोदी करणार अनावरण

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

SCROLL FOR NEXT