Kala Academy: कोट्यवधींचा खर्च, दुरुस्ती का दिसत नाही? कला अकादमीच्या सचिवांना काँग्रेसचा घेराव; मंत्री गावडे यांच्यावरही टीका

Goa Congress: गावडे यांनी कलाकारांची माफी मागावी, अशी मागणी सदस्यांनी केली. याप्रसंगी जॉन नझारेथ, सरचिटणीस प्रणव परब, विशाल वळवईकर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Goa Congress, Kala Academy
Goa Congress, Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला अकादमीचे सचिव अरविंद खुटकर यांनी सोमवारी सायंकाळी उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात आला. उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सदस्य सचिवांवर प्रश्नांचा भडीमार केला.

शरद पोंक्षे यांना ‘सुपारीबाज'' म्हणून कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यातून कलाकाराचा अपमान झाल्याने गावडे यांनी कलाकारांची माफी मागावी, अशी मागणी सदस्यांनी केली. याप्रसंगी जॉन नझारेथ, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस प्रणव परब, विशाल वळवईकर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या भेटीविषयी परब म्हणाले, शरद पोंक्षे यांच्या नाटकाच्यावेळी प्रकाश योजनेतील बिघाडामुळे नाटक बंद ठेवावे लागले होते, त्या पोक्षें यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याच पोंक्षे यांना मंत्री गोविंद गावडे हे ‘सुपारीबाज'' म्हटले आहे, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करीत आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात जे कोट्यवधी रुपये खर्च केला, त्यात काहीच दुरुस्ती दिसत नाही.

दामोदर दाभोळकर म्हणाले, कला अकादमीची जी वाट लागली आहे, त्यास या नूतनीकरणाच्या कामात जेवढी खाती सहभागी आहेत, तेवढी जबाबदार आहेत. कोणत्याही कलाकारांचा सन्मान राखणे गरजेचे आहे, परंतु येथील समस्यांवर बोलल्यानंतर मंत्री गावडे त्याच कलाकारांना दोष देत आहेत, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.

स्वतः कलाकार असलेल्या गावडे यांनी परराज्यातून आलेल्या इतर कलाकारांचा मान राखायला हवा होता, त्यांची क्षमा मागितली असती तर काय बिघडले असते, असा सवाल त्यांनी केला. गेल्यावर्षी तियात्र स्पर्धा झाली, त्या स्पर्धेपूर्वी मंत्री गावडे यांनी तियात्रिस्टांना बोलावून समस्या जाणून घेतल्या आणि त्या दुरुस्त केल्या जातील, असे सांगितले.

Goa Congress, Kala Academy
Kala Academy: AC सुरू करा! प्रेक्षकाने भरत जाधव यांचे नाव घेऊन केली सूचना; 'पुरुष'नंतर कला अकादमीत प्रेक्षकांचा पुन्हा रसभंग

काहीच दिवसांपूर्वी दुसरी तियात्र स्पर्धा झाली तरीही त्याच समस्या कायम असल्याचे दिसून आले. कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी आणखी कोट्यवधींची निविदा काढली जाणार असल्याचेही उपस्थितांनी सांगितले.

ॲड. जितेन गावकर म्हणाले, अकादमीतील ज्या समस्या समोर येत आहेत, त्या कंत्राटदारांवर कारवाई करायला हवी. उगाच कलाकारांनी समस्या सांगितल्या म्हणून त्यांना सुपारीबाज म्हणून बाजू झटकण्याचे काम करू नये. दरम्यान, सदस्य सचिव खुटकर यांनी सरकारच्यावतीने बाजू मांडली. मात्र, शिष्टमंडळ सदस्यांच्या प्रश्नांचे समाधान झाले नाही.

Goa Congress, Kala Academy
Kala Academy: साऱ्या प्रेक्षकांनीही सुपारी घेतली होती का? अभिनेते पोंक्षेंचे गावडे यांना प्रत्युत्तर; विचार करून बोलण्याचे केले आवाहन

योग्य तो निर्णय घेतील!

कला अकादमीप्रश्नी भाजपचे स्थानिक नेते, सरकार व पक्षश्रेष्ठी मिळून योग्य वेळी, योग्य तो निर्णय घेतील असे सूचक उद्‍गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काढले आहेत. त्यांनी म्हटले आहे, की एक प्रेक्षक, कलाकार म्हणून कला अकादमीच्या परिस्थितीबाबत मलाही वाईट वाटते. लोकही मला त्याबाबत सांगत असतात. मला जसा त्रास होतो तसा तो दुसऱ्यालाही होत असणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com