Kala Academy Goa: नूतनीकरणाचे काम सुरू व्हायच्या आधीपासून कला अकादमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राज्याच्या कला आणि संस्कृतीचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कला अकादमीबाबत आता पुन्हा एक नवा प्रकार समोर आला आहे. शनिवारी (27 जानेवारी) संध्याकाळी दीनानाथ मंगेशकर सभागृहात पाणी आल्याची घटना घडली.
माहितीनुसार, तिथे असलेल्या पाण्याच्या वाहिनीला गळती लागल्याने अकादमीच्या प्रेक्षकगृहातील नव्याने पायाखाली टाकलेल्या प्लायवूड सीटवर पाणी आले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
तसेच ओल्या झालेल्या प्लायवूड सीट सुकवण्यासाठी टेबल फॅनचा वापर केला गेला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरून पुन्हा एकदा अकादमीच्या नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे अधोरेखित झाले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर 'शाहजहानच्या ताजमहलमध्ये पाणी शिरले...' अशा खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कला अकादमी सुरू झाल्यापासूनच बांधकामाशी निगडीत काही-ना-काहीतरी घटना समोर येत आहेत. यावरून विरोधी पक्षातील नेते सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.