सारमानस फेरी धक्क्याकडे सुरक्षेची उपाययोजना करा. पिळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत मागणी. बेकायदा गोष्टींवरून ग्रामसभा तापली.
रामकृष्ण नायक यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन. मडगाव येथे सायं. 5 वाजता होणार अंत्यसंस्कार. त्यांनी 'स्नेहमंदिर बांदोडा'ची स्थापना केली होती. ते मुंबईच्या 'गोवा हिंदू असोसिएशनचे अध्वर्यू होते. मराठी नाट्यसृष्टीसाठी नायक यांनी बहुमोलाचे योगदान दिले.
नावेलीच्या मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित खेलो इंडिया महिला वुशू लीगमध्ये आमदार व्हेंझी व्हिएगस यांचा 'मेडल हाड नोकरी घे'वर भर. ऑक्टोबरमध्ये उत्तराखंड येथे होणाऱ्या 38 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी गोव्याच्या विद्यार्थ्यांना खात्रीशीर बजेट मिळवून देण्याचे व्हेंझी यांचे आश्वासन
म्हार्दोळ येथील जाई उत्पादक शेतकऱ्यांना पंचायतीचा दिलासा. येत्या बुधवार-गुरुवारपर्यंत जाईच्या मळ्याखाली मुख्य रस्त्यावर असलेल्या बेकायदेशीर गॅरेज व अन्य आस्थापनांवर कारवाई करण्याचे सरपंच हर्षा गावडे यांचे ग्रामसभेत आश्वासन.
पेडे जंक्शनवर 6 वाहनांमध्ये अपघात. यामध्ये 3 ट्रक आणि 3 दुचाकींचा समावेश. ही घटना आज (28 जानेवारी) 1 वाजता घडली असून यामध्ये 2 मुलांसह 4 जण जखमी. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुरगावमध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन
अखिल गोवा काँग्रेस इतर मागास वर्गीय (ओबीसी) समितीचे अध्यक्ष शरद चोपडेकर यांनी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित केले होते. यात अखिल गोवा आयुर्वेदीक वैद्यकीय संघटना सहभागी होती. यामध्ये मोफत दंत तपासणी, नेत्र तपासणी व हाडांची तपासणी करण्यात आली. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
रॉबर्ट कुतिन्हो व अँटोनियो डिसोझा यांच्या 'रोमियो लेन' या शॅकच्या अवैध बांधकामावार दुसऱ्या दिवशीही (28 जानेवारी) कारवाई करण्यात आली. पर्यटन खात्याकडून अवैध बांधकाम पाडण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई सुरू आहे.
कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेस बहुतेक पंचसदस्यांसह ग्रामस्थांचीही पाठ. अकरापैकी सहा पंचसदस्य अनुपस्थित. जेमतेम 12 ग्रामस्थांची उपस्थिती.
माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले.
मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या 36व्या राष्ट्रीय ज्युनियर नेटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात गोवा अंतिम फेरीत. चुरशीच्या उपांत्य लढतीत केरळवर 38-36 फरकाने मात.
गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आगामी विधानसभा अधिवेशनाच्या दृष्टीने पणजीतील मुख्यालयात 31 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील. यावेळी ते सामन्यांच्या समस्या आणि म्हणणे जाणून घेतील.
पर्वरी येथे रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पंजाबचा गोव्यावर सहा विकेट राखून, रविवारी (28 जानेवारी) सकाळी तासाभरात सामना संपला. यंदा स्पर्धेत गोव्याचा दुसरा पराभव, तर पंजाबचा पहिला विजय
कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात पाणी आल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अकादमीच्या प्रेक्षागृहातील नव्याने पायाखाली टाकलेल्या प्लायवूड सीटवर पाणी आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ओल्या झालेल्या प्लायवूड सीट सुकवण्यासाठी पंख्याचा वापर केला गेला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने याविषयी वृत्तही दिले. पाण्याच्या वाहिनीला गळती लागल्याने पाणी आल्याचे दिसून येते.
पर्यटन संचालक सुनील अंचिपका यांच्यावर न्यायालयाची बेअदबी केल्याप्रकरणी कारवाई का करू नये अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बजावली आहे. किनारी भागातील अतिक्रमणे हटवणे आणि बेकायदा बांधकामांतील व्यवसाय बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्याची पूर्तता झाली नव्हती. मुख्य सचिवांनी आता व्यवसाय बंदचा आदेश जारी केल्याची माहिती न्यायालयाला दिल्यानंतर १४ डिसेंबरनंतर पर्यटन खात्याने कोणतीही कारवाई न केल्याबद्दल न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.
मडगावमधील गांधी मार्केटमध्ये काल (शनिवारी) 3 वर्षांची एक अज्ञात मुलगी पोलिसांना सापडली. त्यानंतर वाऱ्यासारखी ही खबर राज्यभरात पसरली. सोबतच मुलीचा फोटो आणि तिच्या पालकांना/परिचितांना आवाहन करणारा संदेशही झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मात्र अद्याप तिच्या पालकांचा शोध लागला नाही. मुलीला सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मुलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण तिला तिच्या कुटुंबाबाबत किंवा तिच्या पत्त्याबाबत काहीच सांगता आले नाही.
गोव्यातील मोपा येथील मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हॉटेल भूखंडांच्या भाडेतत्त्वाला दिलेल्या वाढीवरुन नवा वाद सुरु झाला आहे. मंत्रिमंडळाने अलिकडेच भूखंड सब-लीजला 40 वर्षावरुन 60 वर्षांच्या वाढीसाठी मंजुरी दिली.
भाडेपट्टा मंजुरीत योग्य प्रक्रिया आणि कायदेशीर नियमांचे पालन न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीच भाजप आणि कॉंग्रेसची शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. भाजपने कॉंग्रेसवर समाज माध्यमांवर तुटून पडत याची सुरवात केल्यानंतर कॉंग्रेसने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 98.08
Panjim ₹ 98.08
South Goa ₹ 97.38
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 90.62
Panjim ₹ 90.62
South Goa ₹ 89.94
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.